कमी पटसंख्येच्या शाळा बंदच्या निर्णयाविरुद्ध शिक्षक भारतीची ठराव मोहीम

68

🔸गावोगावी व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायतचे ठराव घेणार

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमुर(दि.10ऑक्टोबर):-ग्रामीण भागातील शाळा टिकाव्यात, वाडी वस्तीतील मुले शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर फेकली जाऊ नये यासाठी आपल्या गावातील शाळा वाचव्यात म्हणून शिक्षक भारतीने राज्यात पुढाकार घेतला आहे. प्रशासकीय स्तरावर २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.याविरोधात शिक्षक भारतीने शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायतचे ठराव घेण्याची मोहीम हाती घेतली आहे अशी माहिती शिक्षक भारतीचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष सुरेश डांगे यांनी दिली आहे.

या मोहिमेत विद्यार्थी, पालक, समविचारी संघटना, सामाजिक संघटना, सरपंच, उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य सहभागी होणार आहेत.आमदार कपिल पाटील यांचे मार्गदर्शनात आणि शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, प्राथमिक शिक्षक भारतीचे अध्यक्ष नवनाथ गेंड यांचे नेतृत्वात ही मोहीम राबविली जाणार आहे.

शाळेच्या परिसरात विद्यार्थी, पालक,गावातील नागरिक,समविचारी व्यक्ती एकत्र येऊन शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून शाळा वाचवा अभियान राबविले जाईल.शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामपंचायत यांचेवतीने दोन स्वतंत्र ठराव करण्यात येतील.ग्राम स्तरावर आलेले ठराव एकत्र करून ते जिल्हाधिकारी यांना देण्यात येतील.शाळा बंद करण्यात येऊ नये या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन शिक्षक भारती राज्य उपाध्यक्ष प्रकाश ब्राम्हणकर, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुरेश डांगे,रावण शेरकुरे,जब्बार शेख,नंदकिशोर शेरकी, राजाराम घोडके,विरेन खोब्रागडे,राजेश घोडमारे, डाकेश्वर कामडी,कैलास बोरकर, राजेश धोंगडे, निर्मला सोनवणे, रंजना तडस, माधुरी डोंगरकर आदीनी केले आहे.