खातगुण येथे तलाव्यांचे ओटी भरण्याचा कार्यक्रम उत्साहात साजरा

65

✒️सातारा-खटाव प्रतिनिधी(नितीन राजे)

सातारा(दि.11ऑक्टोबर):-जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील खातगुण येथील गावाच्या पश्चिम दिशेला तळेश्वर मंदिर व डोंगर भागात यावर्षी जोरदार पाऊस झाल्याने येथील पाण्याचे तलाव सांडव्यातून वाहत असून तळेश्वर मंदिराचे नियोजन करते माजी पोलीस उपनिरीक्षक धनाजी लावंड भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली येथील प्रमुख पाच तलाव्याचे ओटी भरण करण्यात आले यामध्ये ताराबाई व मानाबाई हा तलाव मोठा असल्याने पहिल्यांदा या तलाव्याची ओटी भरण महिला व पुरुष यांनी मिळून तलाव्यांची ओटी भरण केली यानंतर तळेश्वर तलाव, वाघझरे तलावा एक व दोन ,वाटीचा तलाव ,अशा पाच तलावांची ओटी भरण करण्यात आली

यावेळी खातगुण विविध सहकारी सोसायटीचे चेअरमन विजय लावंड, खटाव मंडल विभागाचे कृषी सहाय्यक रूपाली पंडित, माजी चेअरमन शामराव भोसले, ग्रामपंचायत सदस्य अनिल लावंड सातारकर ,मराठी विषयावर प्रभुत्व असणारे शंकर लावंड सर , तानाजी लावंड( दादा), भरत जाधव. व महिला यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम करण्यात आला

यावेळी माजी प्राध्यापक शंकरराव लावंड यांनी वरून देवाला सामुदायिक विनंती प्रार्थना घेण्यात आली यावेळी महिलांनी आनंदाने तलाव्याच्या काठी गणपतीची आरती, शंकर महादेवाची आरती, महिलांचा फेर, फुगडी, रिंगण ,व असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले.

)यावेळी माजी सैनिक आनंदराव लावंड ,महेश लावंड , मोहनराव जाधव, वसंत झांजुर्णे ,किरण जाधव, हनुमंत लावंड, प्रकाश लावंड, शिवाजी जाधव ,संपत लावंड, प्रकाश लावंड, संजय गायकवाड, चंद्रकांत लावंड टेलर ,सचिन भोसले ,दीपक लावंड, ज्योतीराम झांजुर्णे , प्रमोद भोसले ,अनिल झांजुर्णे, शिवनाथ काटकर, जगन्नाथ चिंचकर, त्रिंबक लावंड, शशिकांत लावंड, तर महिलांमध्ये स्वाती लावंड, अनिता झांजुर्णे, प्रीती जाधव, मंगल भोसले, रेश्मा भोसले, मालन जाधव ,मंगल करांडे, उज्वला लावंड, सुनीता लावंड, वैशाली लावंड, शांताबाई जाधव, शुभांगी गायकवाड, सुनिता काटकर, सुनीता लावंड ,मंदाकिनी लावंड, ज्योती लावंड , या महिलांची उपस्थिती होती तर ओटी भरण्याचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तानाजी लावंड (दादा),ऋषिकेश भोसले, संपत लावंड ,यांनी या कार्यक्रमाचे यशस्वी व नेटके नियोजन पार पाडले तर लोकांना चहा व फराराचे नियोजन केले होते माजी पोलीस उपनिरीक्षक धनाजी लावंड (भाऊ ) यांनी सर्व लोकांचे आभार मानले.