अभियंता उबाळे यांच्यावर निलंबनाची कारवाई न केल्यास अभियंता कार्यालय समोर हालगीनाद आंदोलन: खुपसे पाटील

16

✒️नानासाहेब ननवरे(कुरुल प्रतिनिधी)

करमाळा(दि.11ऑक्टोबर):- तालुक्यातील कोर्टी-आवाटी या रस्त्याचे काम एन.पी. कन्ट्रक्शन या कंपनीने घेतले आहे. अकलूज येथे आंदोलन केले त्यावेळेस दि. 14/10/ 2022 रोजी होणाऱ्या अधिक्षक अभियंता सोलापूर यांच्या मिटींगमध्ये जर खोटे पत्र दिलेल्या उपविभागीय अभियंता उबाळे यांच्यावर निलंबनाची कारवाई आणि एन.पी इन्फ्रा प्रा.लि. या कंपनीवर दंडात्मक कारवाई झाली नाहीतर दि. 17/10/2022 रोजी अधिक्षक अभियंता यांच्या कार्यालयात बेमुदत हालगिनाद आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुतळ्याचे दहन करून आंदोलन करू असा इशारा जनशक्तीचे संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

आर.एस.आय‌.आय‌.एल-एन.पी इन्फ्रा प्रा.लि. पुणे या कंपनीने करमाळा तालुक्यातील 140 कोटी रुपयाचे काम घेतले आहे. उपविभागीय अभियंता आणि गुणवत्ता तपासणी अधिकारी हे ली असोसिएट्स साउथ एशिया प्राइवेट लिमिटेड बार्शी मिळून एन.पी कन्स्ट्रक्शन कंपनी कडून अर्थ पूर्ण व्यहवार करून निकृष्ट दर्जाचा रस्ता तयार करण्याचे आणि काही ठिकाणी त्याच रस्त्यावर डांबर ओतून बिल काढण्याचा प्रकार होत असून या विरोधात दौंड – करमाळा – परांडा – बार्शी 68 या रस्त्याच्या कामासंदर्भात कोर्टी ते आवाटी या रस्त्याच्या काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे.या संदर्भात 18/02/2022 रोजी जनशक्ती संघटनेने करमाळा बांधकाम विभाग पुढे आंदोलन केले होते या आंदोलनात उपविभागीय अभियंता उबाळे साहेब यांनी कंपनीवर दर दिवस 8.50 लाख नुसार कामास विलंब झाला म्हणून दंड थोटवलेले पत्र जनशक्ती संघटनेस दिले होते ते पत्र खोटे असल्यामुळे जनशक्ती संघटनेने परत कार्यकारी अभियंता अकलुज यांच्यासमोर आंदोलन केले.

त्यावेळी कार्यकारी अभियंता यांनी दि. 14/10/2022 रोजी अधिक्षक अभियंता यांच्या कार्यालयात मिटींग लावण्याची लेखी आश्वासन दिले असल्यामुळे ते आंदोलन स्थगित करण्यात आले होते. जर दि. 14/10/2022 रोजी होणाऱ्या अधिक्षक अभियंता सोलापूर यांच्या मिटींगमध्ये जर खोटे पत्र दिलेल्या उपविभागीय अभियंता उबाळे यांच्यावर निलंबनाची कारवाई आणि एनपी इन्फ्रा प्रा.लि. या कंपनीवर दंडात्मक कारवाई झाली नाही तर दि. 17 ऑक्टोंबर रोजी अधिक्षक अभियंता यांच्या कार्यालयात बेमुदत हालगीनाद आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुतळ्याचे दहन करून आंदोलन करणार आहोत तरी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असे जनशक्तीचे संस्थापक अतुल भाऊ खुपसे पाटील यांनी इशारा दिला आहे.