त्या शिक्षिकेला निलंबित करा अन्यथा आमरण उपोषण करू – प्रभाकर सार्वे (स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुका प्रमुख भंडारा )

44

🔸स्वाभिमानी शेतकरी संघटने तर्फे शिक्षणाधिकारी प्राथमिक भंडारा याना निवेदन

🔹मांडवी येथील शिक्षीका सौ.रेखा दलाल यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

भंडारा(दि.12ऑक्टोबर):- तालुक्यातील मांडवी येतील शाळेत नेहमी उशीरा येणाऱ्या तसेच अमृत महोत्सव निमित्याने हर घर तिरंगा असे घोषणा मा. प्रधानमंत्री यांनी दिली होती परंतु मांडवी गावातील शिक्षीका रेखा दलाल यांनी अमृत महोत्सव कालावधीमध्ये 14 व 15 ऑगस्ट रोजी गैरहजर होत्या.

गेल्या काही महीन्यापासून शिक्षण विभागाकडे लेखी तक्रार करण्यात येवूनही कुठलीच दखल घेतली नसल्याने आखीर मांडवी उच्च प्राथमिक शाळेला कुलूप ठोकुन रोष व्यक्त करण्यात आले होते. त्यावेळी संबधीत अधिकाऱ्यांकडून शिक्षिका दलाल यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना देण्यात आली होती. परंतु 20 दिवस होवून सुद्धा आतापर्यंत कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. शालेय वेळेत कायम मोबाईल मध्ये व्यस्त राहणाऱ्या कामचुकार प्राथमिक शिक्षिकाची बदली करण्यात आली पण त्याठीकाणी नवीन शिक्षक माडंवी शाळेमध्ये देण्यात आले नाही.

यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पालकाकडून व ग्रामस्यांच्यावतीने वेळोवेळी गटशिक्षणधिकान्यांना तक्रारी केल्या मात्र शिक्षण विभाग बेजबाबदार शिक्षीकेला पाठीशी घालत असल्याचा आरोप नागरिकांनी निवेदनात केला आहे. वर्षापासून कामचुकार शिक्षिकावर लेखी तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने नागरीकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. आता या शिक्षीकावर वरीष्टानी निलंबित कारवाई करावी अशी मांडवी वासीयांनी म्हटले आहे. यावर कारवाई न केल्यास 19 आक्टोंबर 2022 रोजी जिल्हाधीकारी कार्यालय सामोर आमरण उपोषण करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.