“संभाजी ब्रिगेडचे ” करण तायडे ” यांनी युवकांसमोर ठेवला नवा आदर्श..!

37

✒️अमरावती(पुरोगामी न्युज नेटवर्क)

अमरावती(दि.12ऑक्टोबर);-दरवर्षी करण तायडे हे आपल्या वाढदिवसा निमित्त दरवर्षी काहीतरी समाजकार्य घडावे या हेतूने वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवित असतात..

तसेच दरवर्षी प्रमाणे यावर्षीही काहीतरी वेगळेपण दाखवत, वाढदिवसाच्या माध्यमातून शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांची व पुतळ्यांसमोरील परीसराची संपूर्ण स्वच्छता अभियान राबविले. ज्या महापुरुषाने आपल्या झाडूनी गाव, गल्ली, स्वच्छ करुन रात्री माणसातील अंधश्रद्धा, कर्मकांड आपल्या विचारांनी स्वच्छ केले. स्वछतेचे जनक, समाजसुधारक, प्रबोधनकार संत गाडगेबाबा यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन, संत गाडगेबाबा मंदिर परीसर, राजमाता जिजाऊ स्मारक व परीसर, डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक परीसर व हुतात्मा परीसर येथे स्वच्छता अभियान राबविले. आणि महापुरुषांच्या सर्व स्मारकांची स्वच्छता करुन हार अर्पण करत “स्मारक स्वच्छता अभियान” राबवीले. तरी समाजकार्यात हातभार लावून युवा पिढीसमोर एक आदर्श निर्माण करुन एक प्रेरणादायी विचार दिला.

यावेळी उपस्थिती शहराध्यक्ष सुयोग वाघमारे, संगितसूर्य केशवराव भोसले प्रदेशाध्यक्ष वर्षाताई धाबे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा मनालीताई तायडे, शिवाजी चव्हाण, संदीप तुरुंगे, निलेश सोनटक्के, शुभम राणे, अंकूश खरड, शुभम खडसे, शिवम उमक, नितेश राणे, अक्षय तायडे, कार्तिक पवार, व संभाजी ब्रिगेड चे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते..