मॅनोफोबीया !

94

शिवसेनेचे कुटुंब भाजपच्या खडकावर आदळून फुटले.दोन शकले झाली.आधे इधर,आधे उधर.बाकी भाजपके पिछे.इतर राजकीय पक्ष अनेकदा फुटलेत. इतकी जीवघेणी सिझरींग कधीच झाली नाही. डॉ फडणवीस म्हणतात,थोढा वेळ वेदना होतील.नंतर जखमा सावरतील.या सिझरींग मधून शिवसेनेने कात टाकली पाहिजे.पक्ष संघटनेला राजकीय रुप दिले पाहिजे.शिवसेना अजूनही राजकीय पक्षाची संहिता मानत नाही.असे अनेक घटनांवरून स्पष्ट होते.मागील वर्षी एसटी कर्मचाऱ्यांनी पांच महिने संप केला.काय मागितले? मुख्यमंत्रीची खुर्ची किंवा शिवसेना प्रमुखपद नाही मागितले.त्यांनी मागितली वेतनात वाढ आणि एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण.सरकारला जे जे शक्य ते ते करू शकते.पण किमान संपकऱ्यांशी भेटा,बोला.भेटायला अयोध्या किंवा हरिद्वार ला जाण्याइतके कठीण नव्हते.मंत्रालय पासून हाकेच्या अंतरावर होते. मंत्रालय ते बांद्रा मातोश्री च्या वाटेवरच होते.कोण होते हे एसटी कर्मचारी?ते तर आमच्याच महाराष्ट्र राज्याचे पिढीजात वारस होते.ते महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी होते.त्यापैकी अनेक तर शिवसेनेचे मतदार होते.त्यांना इतके अव्हेरले कि त्यांचा संताप अनावर झाला.त्यांनी शरद पवारांच्या सिल्व्हर पैलेसवर चप्पलाहार घालून पत्थरप्रहार केला.असे करणे कोणताही गुन्हा नाही.ही हक्काची लढाई आहे.सत्तेचा माज असल्यामुळे त्यांची वेदना पवारांनी लक्षात घेतलीच नाही.आणि ठाकरेंनी सुद्धा! फ्रांसचा चौदावा लुई आणि इराकचा सद्दाम हुसेन चा इतिहास आठवला.माननिय उद्धव ठाकरे साहेब , लोकांना तुम्ही भेटत नाहीत.का? मॅनोफोबीया असू शकतो का?

महाआघाडी सरकार होते.राज्यपाल नियुक्त बारा लोकांची विधानपरिषदेत नियुक्ती साठी यादी पवार साहेबांनी तुम्हाला दिली.तुम्ही न वाचता राज्यपाल कडे पाठवून दिली.आम्ही जळगाव जिल्हा जागृत जनमंच आपणास भेटून यातील आक्षेपार्ह व्यक्ती,खडसे बाबत निवेदन देणार होतो.चर्चा करून विरोध करणार होतो.आपणाकडे अनेक वेळा विनंती करूनही आपण भेट दिली नाही.शेवटी आम्ही राज्यपाल महोदयांना भेटून कैफियत मांडली.त्यांनी ऐकून घेतली.मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे साहेब भेटत नाहीत म्हणून राज्यपाल मा.भगतसींग कोशीयारी साहेबांना भेटलो.ठाकरे साहेब,लोक पर्याय शोधतात.आम्ही शोधला.तुम्ही टाळले म्हणून शोधला.माननिय उद्धव ठाकरे साहेब आपण लोकांना का भेटत नाहीत?मॅनोफोबीया असू शकतो का?

उद्धव ठाकरे साहेब,तुमचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी कोरोना काळातील निधीत गडबड घोटाळा केला.तुम्ही त्यांना उपनेते बनवले.तुम्ही त्यांना सेनेची तोफ म्हणत असत.म्हणून तुमच्याकडे भेटून पाटलांना मंत्रीपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी करीत होतो.पण तुम्ही भेट दिली नाही.आम्ही तुमच्यावर संशय घेतला कि मंत्रीच्या चोरीतून मुख्यमंत्री ला वाटा हिस्सा मिळाला असेल का?तुम्ही भेटून हा संशय खोटा ठरवला असता.पण तुम्ही भेट दिलीच नाही.तर आम्ही आमचा संशय तसाच ठेवायचा का?आम्ही या अपहाराची तक्रार गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचेकडे केली.पण व्यर्थ.कारण राष्ट्रवादी ला भ्रष्टाचाराचे वावडे नाही.त्यांना भ्रष्टाचाराची चीड येत नाही.पण तुम्ही सुद्धा?

माननीय एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडून भाजपसोबत सरकार बनवले.शिंदे साहेब मुख्यमंत्री बनले.तर गुलाबराव पाटील यांना मंत्रिपद देऊ नये,अशी तक्रार घेऊन मुंबई स्थित मलबार हिलवर शिंदे साहेबांची भेट मागितली.बरीच वादावादी नंतर बिझी शेड्युल मधे त्यांनी भेट दिली.आमची तक्रार ऐकून तर घेतली.त्यांनी उत्तर दिले ते मात्र त्यांना शोभेल असेच होते.म्हणे, आमच्या कडे सर्वच आमदार भ्रष्टाचारी आहेत.तर मग , मंत्री बनवायचे कोणाला?

सांप्रत मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांनी पायाला भिंगरी लावून फिरण्याचा सपाटा लावला आहे.वाट्टेल तेथे जातात.वाट्टेल त्याला भेटतात.मंत्रालयात बसून रात्रभर बसून सकाळ होईपर्यंत आगंतुकांना भेटणे,खरेच चांगले आहे.हा मॅनोफेमिया असू शकतो.पदाचा आणि वेळेचा अतिरिक्त वापर करणे, चांगले लक्षण आहे.नेत्याची उपलब्धी आणि ऐकून घेण्याची संधी लोकांना आवडते.शिंदे सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेऊन खूप चांगले काम केले आहे.महाआघाडी सरकारचा पाडाव झाल्यानंतर माननीय आदित्य ठाकरे जळगाव जिल्ह्यात आले.त्यांचेकडे उपरोक्त भ्रष्टाचाराची तक्रार करणार होतो.म्हणून मुद्दाम २०सप्टेबर ला आकाशवाणी चौकाजवळच कलेक्टर कचेरी समोर आम्ही मंडप टाकून बसलो.पण आदित्य ठाकरेंनी त्यासाठी पांच मिनिटे खर्ची घातले नाहीत.जनतेच्या समस्या, जनतेच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी वेळ नाही कि दखलच घ्यायची नाही?

अनेक आमदारांनी, मंत्र्यांनी तक्रार केली कि, मुख्यमंत्री ठाकरे साहेब आम्हाला भेटले नाहीत.कोणीतरी आडूमाडू आम्हाला दरवाजाच्या बाहेरच अडवतो.त्या आडूमाडूला ख्याली खुशाली देण्याची पद्धत आहे काय?तसे असेल तर जो कोणी रेतीमातीचा,दारूचा,सट्ट्याचा ,सावकारी, बांधकामाचा व्यवसाय करील तोच भेटू शकतो का?असे असेल तर मग,चांगली माणसे,सभ्य माणसे तुमच्या जवळ येऊ शकत नाहीत.भेटू शकत नाहीत.बोलू शकत नाहीत.म्हणून तर अवैध धंदे करणारी माणसे चिकटलीत.अशी माणसे काही काळ फायदेशीर वाटतात.पण ज्या उद्देशाने येतात त्याच उद्देशाने सोडून जातात.आता त्यांनीच धोका दिला,असे रडण्यात काय अर्थ ? घरात लांडगे,कोल्हे,बिवटे,वाघ पाळले तर तुमची तंगडी खाणारच.शिवसेना एक संघटना आहे.तिचे राजकीय पक्षात परिवर्तन करण्याची गरज आहे.तशी वेळ येऊन ठेपली आहे.रात टाकली.आता कात टाकण्याची संधी आहे.बुद्धीमान, विचारवंत,संयमी माणसे जोडण्याची गरज आहे.आपल्या आमदार विरोधात, आपल्या विरोधात सुद्धा ऐकून घेण्याचे तयारी ठेवण्याची गरज आहे.

राजा आणि प्रजा यांच्या दुजा असू नये.अशी दुजा माणसे प्रजेला आवडत नाहीत.ही पक्षासाठी घातक असतात.यांना भय असते कि,कोणी आगंतुक आपल्या विरोधात तक्रार तर करणार नाही.जहाजाला छेद पडले.त्याची खबर ऐकून घेतली असती तर, कदाचित जहाजात पाणी शिरून जहाज बुडाले नसते.इंग्लंड मधे अजूनही राजा आहे.जेथे सहाशे वर्षे आधी लोकशाही रूजली.आजही सुरळीतपणे चालू आहे.म्हणे तेथे लिखीत राज्यघटनाच नाही. तरीही? का? महाराजांनी स्वतः तेथे हाऊस ऑफ कॉमन्स निर्माण केले.त्यामुळे हाऊस ऑफ लॉर्डस चे महत्व आपोआप कमी झाले.जे महाराजाला अडचणीत आणत होते.लोकशाही रूजवण्यासाठी, टिकवण्यासाठी कॉमन मॅन ला भेटणे, प्रतिसाद देणे काळाची गरज आहे.डोण्ट अंडरइस्टीमेट कॉमन मॅन.धीस कॉमन मॅन इज द मिस्टर इंडिया.

✒️शिवराम पाटील(९२७०९६३१२२)महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव(हा लेख शिवराम पाटील यांच्या अनुभवावर आधारित आहे.)