धर्मांतर घोषणा वर्धापनदिन निमित्ताने बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदीपजी ताजणे साहेब महाराष्ट्र प्रदेश प्रभारी नितीन सिंह जाटव साहेब यांची मुक्तीभुमी येवला येथे भेट

35

✒️संदिप सोनवणे(विशेष प्रतिनिधी येवला)मो:-९६०४१६२७४०

येवला(दि.14ऑक्टोबर):- धर्मांतर घोषणा वर्धापनदिन निमित्ताने बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदीपजी ताजणे साहेब महाराष्ट्र प्रदेश प्रभारी नितीन सिंह जाटव साहेब व यांनी मुक्तीभुमी येवला येथे भेट दिली.याप्रसंगी प्रदेश सचिव आनंद आढाव साहेब, जिल्हा अध्यक्ष संतोष शिंदे साहेब, जिल्हा प्रभारी पौलस आहिरे साहेब, उपस्थित होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा पासून संपूर्ण येवला शहरातून बहुजन समाज पार्टी ची भव्य रॅली काढण्यात आली.महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील बहुजन समाज पार्टी चे हजारो पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोषात रॅली मुक्तीभुमी येथे पोहचली. संपूर्ण रॅली चे नियोजन बहुजन समाज पार्टी येवला विधानसभा व येवला शहर यांच्या वतीने करण्यात आले. मालेगाव शहरातील संपूर्ण पदाधिकारी,तसेच कळवण, मनमाड येथील बसपा चे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. रॅली चा समारोप डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक येवला येथे झाला.

बसपा चे येवला विधानसभा अध्यक्ष ॲड. चंद्रकांत निकम यांनी संपूर्ण जबाबदारी पार पाडली. येवला शहर अध्यक्ष ॲड. योगेश मोहारे, गणेश कोतवाल, आकाश मथुरे, गौतम घुसळे, प्रदीप गायकवाड, गीताराम घोडेराव, माधव गायकवाड, एकनाथ बाबा गायकवाड, संजय निकम, डॉ. केदारे, नाना गायकवाड, अश्विनी निकम, अभिमन्यू शिरसाठ, अनिल खैरनार, प्रवीण पगारे, अविनाश पैलवान, आपा केदारे, मच्छिंद्र आहेर, प्रभाकर पवार, सुनील पवार, गौतम खरे, भीमराव कोतकर,खैरनार सर, इंगळे सर असे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते गण यावेळी हजारो च्या संख्येने उपस्थित होते.