अवजड वाहतूक बंद होणे बाबत सर्वपक्षीय लाक्षणिक उपोषण..

34

🔹वाहतूक विभागाचे सहाय्यक ACP श्री.गायकवाड साहेब यांच्या मध्यस्थीनंतर उपोषण मागे

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.16ऑक्टोबर):-आगर टाकळी येथे आज दिनांक 14/10/2022 वार शुक्रवार रोजी प्रभाग क्रमांक 16 येथील सर्वपक्षीयांच्या वतीने एक दिवसाचे उपोषण करण्यात आले.

दोन दिवसापुर्वी अवजड वाहतुकीच्या धडकेत एक महिला जागीच ठार झाली असून अनेक वर्षापासून या रस्त्यावर अपघात होऊन प्रभागातील नागरिकांचा बळी जात आहे या ठिकाणी ड्रीम सिटी चौक रुंदीकरण अवजड वाहतूक बंद सिग्नल यंत्रांना स्पीड बेकर करण्यात यावे यासाठी नुकतेच एक दिवसीय उपोषण करण्यात आले..या नंतर येत्या 15 दिवसात वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन ACP गायकवाड साहेबांनी दिल्या नंतर उपोषण मागे घेण्यात आले.

याप्रसंगी नगरसेविका सुषमाताई पगारे, नगरसेवक अनिलभाऊ ताजनपुरे,रिपाई नेते महाराष्ट्ररत्न अनिलभाई गांगुर्डे,भाजपा नेते भास्कर घोडेकर,युगांतरचे अध्यक्ष रवि पगारे सर,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय दाजी खैरनार,प्रा.कोमल साळवे,वंचित जेष्ठ नेते बाळासाहेब शिंदे,माजी नगरसेवक शैलेशभाऊ ढगे,राष्ट्रवादीचे प्रमोद पगारे,मनसे चे नितीन साळवे,प्रविण भाऊ आंधळे,पॅंथर गणेश महाराज साळवे,प्रविण बापू महाजन, विनोद डोके, राजू जाधव, नंदु पगारे, कमलेश जाधव, कृष्णा सूर्यवंशी,रिपाईचे सागर आण्णा शिरसाठ,प्रकाशजी पाटील,बाळासाहेब काठे,सचिनदेव गायकवाड,महेंद्र सूर्यवंशी,कामगार नेते किशोर पप्पू साळवे,आकाश नानू साळवे,लक्ष्मण पगारे, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे प्रतिक सोनटक्के, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष महिला आघाडी राज्य अध्यक्षा ताराताई डोके, संघमित्रा मोरे,रुपाली कोरी, सिध्दार्थ भालेराव, राजश्री हिरे,सुमन विश्वकर्मा,रूपालीताई मर्चंडे,नयनाताई मर्चंडे,नयना ताई शर्मा,दिपक पाटील, विक्रांत अनिलभाई गांगुर्डे आदी पदाधिकारी कार्यकर्ते व प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.