आगरी,कोळी, कराडी भूमीपुत्रांच्या जीवावर उठलेले पर्यावरणवादी?

    47

    मुंबई,ठाणे, रायगड, पालघर या अडीच हजार वर्षांपूर्वीच्या अपरांत प्रदेशात हुंडा नाकारणारे मातृसत्ताक स्त्री प्रधान संस्कृतीचे लोक रहात होते, आणि आजही राहतात.जन्मतःच आपल्या आईशी आणि निसर्गाशी कृतद्न्य राहणाऱ्या लोकांनी समुद्राला आणि जमीन जंगल पाणी आकाश यांना आपले आदर्श मानले.जीवनात पूजनीय स्थान दिले.साऱ्या जगात हुंडा नाकारणाऱ्या मातृसत्ताक लोकांना बाहेरून असलेल्या पुरुषसत्ताक ब्राह्मण क्षत्रिय वैश्य मनुवादी लोकांनी आज भूमाफिया, रेतीमाफिया, दगड माफिया आणि पर्यावरण विरोधी ठरविले.

    पोटच्या मुलीला हुंडा द्यावा लागेल? या स्वनिर्मित स्त्री विरोधी मनुस्मृतीच्या कायद्यामुळे गर्भातच मारणारी स्वतःस वैदिक ब्राह्मणी म्हणणारी जमात जन्मदात्या स्त्री विरोधी आहे.आईला ठार करणाऱ्या ब्राह्मणी परशुरामाचे शिवधनुष्य एकाने हाती घायचे दुसर्याने अयोध्येच्या रामाचे तत्वज्ञान मांडून ते तोडायचे? ही अलीकडची घटना,मूळ पुरुषसत्ताक विषमता वादी संविधान विरोधी ओळख लपवू शकलेली नाही. इथल्या भूमिपुत्रांना आपल्या स्त्री पुरुष समता सांगणाऱ्या संविधानिक संस्कृतीचा अभियान वाटला पाहिजे. 2005 पासून कोळीवाडा गावठाणात जाऊन समस्त मातृसत्तेचा अभ्यास करून हा अडीच हजार वर्षे जुना परंतु नव्या युगात नित्य नूतन एकविरा मातृसत्ताक विचार मांडण्याचा माझा प्रयत्न राहिला आहे.सुरुवातीच्या ब्राह्मणी विरोधातून हळू हळू आमच्या महान मागासवर्गीय ओबीसी जातीतील ही श्रेष्ठ परंपरा समाज स्वीकारू लागला आहे.

    आमच्यावर नव्याने होणारे हल्ले, त्याला परतवून लावणे यासाठी कठीण होत आहे, की ते दुसऱ्या देशातील शत्रूंकडून होत नाहीत? तर आमच्याच देशातील उच्चवर्णीय पर्यावरण वादी तथाकथित समाजसेवक,एनजीओ यांच्याकडून होताहेत. इथला सागरपुत्र समाज हजारो वर्षे परकीय इंग्रज पोतृगीज फ्रेंच मोगल यांच्यासमोर समुद्रात लढला. रत्नागिरीच्या समुद्रात जगजेत्या इंग्रजांचे आरमार बुडविणारे आम्ही छत्रपती शिवरायांचेआरमारी मावळे आहोत. येथील बंदरे खाड्या नदीमुखे यातून देशाचा सागरी व्यापार आणि भारताच्या सागरी सीमांचे तटरक्षक आगरी कोळी भंडारी गाबीत मच्छीमार होते.आज त्यांचे अस्तित्व नाकारणारे उच्चवर्णीय लोक सत्तेच्या जोरावर आमचा इतिहास भूगोल आणि पारंपरिक व्यवसाय संपवित चालले आहेत.

    सह्याद्रीच्या पर्वत रांगेतून उगम पावणाऱ्या पश्चिम वाहिनी नद्या प्रचंड वेगाने वाहतात.सोबत दगड गोटे माती यांचा गाळ घेऊन येतात आणि नदीमुखे उथळ करतात. नदीमुखा जवलील बंदरे गाळाने भरली तर येथे मोठ्या उंचीची जहाजे नांगरने (पार्किंग करणे) कठीण होते. त्यासाठी रोज येथील गाळ म्हणजेच रेती उपसने गरजेचे असते. हे सागरी हालचाली करणाऱ्या सर्वच जागतिक दर्यावर्दी लोकांना माहीत आहे. मनुस्मृतीच्या शाळेत शिकलेल्या आमच्या पर्यावरण वादी ब्राह्मणी लोकांना हे सागरशास्त्र जन्मतःच निषिद्ध आहे? कारण मनुस्मृती समुद्र उल्लंघन निषिद्ध मानते. या नात्याने भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवराय आणि आम्ही समस्त सागरपुत्र ब्राह्मण क्षत्रिय वैश्य लोकांचे शत्रूच आहोत.

    आज कोकणातील सारी बंदरे महाराष्ट्र सरकारच्या उच्चवर्णीय मानसिकतेने गाळाने भरली.कारण यांच्या पर्यावरण वादी धोरणात रेतीवालयांचा आर्थिक उत्कर्ष डोळ्यात खूप लागला.आगरी कोळी रेती व्यावसायिक पत्रकार महसूल विभाग पोलीस यांनी हे सागरपुत्र लोक रेती माफिया ठरवले गेले.बोटी,रेती यंत्रे स्फोट घडवून नष्ठ करणाऱ्या जोशी आडनाव धारण केलेल्या ठाणे जिल्हाधिकारी ब्राह्मण असतील? यात कोणत्याही मागासवर्गीय माणसाला शंकाच नको.रेती काढल्याने जलवाहतूक सुकर होते. मोठे मासे तेथे येतात अंडी घालतात. महसूल विभागास उत्पन्न मिळते.परंतु सुखी समृद्ध होणारे आगरी कोळी कराडी वाढणारा बांधकाम व्यवसाय मराठा ब्राह्मण राज्यकर्त्यांना पचेल तर ना?आमच्या रेती वाल्या लोकांना आपल्या व्यावसायिक हिताची भूमिका मांडण्यासाठी कुणी तोंडे शिवली आहेत? रुपयातले दहा पैसे खर्च करण्याची इमानदारी नाही.

    या कपाल करंटे पणाचा मी जाहीर निषेध करतो. वाईट याचे वाटते आपले सामाजिक राजकीय धार्मिक शत्रू समजून न घेतल्याने केवळ ओबीसींच्याच नाही तर महाराष्ट्राच्या आर्थिक नुकसानीत रोज भर पडत आहे. गुजरात मध्ये रेती व्यवसाय जोरदार सुरू आहे. मिठागरे सुरू आहेत आणि महाराष्ट्रात बंदी आहे. मोदींना अनुकूल असलेले महाराष्ट्रातील राज्यकर्ते ओबीसी विरोधी का आहेत?.

    आज वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात खडी दगड खाणीचा विषय चर्चेला आला.आगरी कोळी कराडी प्रकल्पग्रस्त शेतकरी विरोधी मराठा मुख्यमंत्री वसंत दादा पाटील यांनी बंदुकीच्या गोळ्या घालून जबरदस्तीने आमच्या जमिनी ताब्यात घेतल्या.नवी मुबंई हे शहर इथल्या भूमिपुत्र मातृसत्ताक लोकांवर पोलिसी बळाचा वापर करून बांधले आहे.या क्रूर इतिहासाचा अभ्यास करून या भूमीत लोकनेते दि बा पाटील याना वंदन करूनच उतरावे लागेल.ज्यांनी नवी मुंबई शहराचा घाट घातला. त्या सिडकोला माहीत होते की या शहराच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात खडी आणि दगड लागेल. अर्थात तो सातारा बारामती नागपूर येथून आणून चालनार नाही. आर्थिक दृष्ट्या ते परवडणार नाही. बांधकाम खर्च वाढेल.म्हणूनच वनविभागाच्या जागेत सिडकोने दगड खाणींचे भूखंड येथील आगरी कोळी कराडी सिडको प्रकल्पग्रस्त ओबीसींना स्वेच्छेने दिले. शेती मासेमारी रेती मिठागरे हे पारंपरिक व्यवसाय सिडकोने सरकारी विकासात संपविले, म्हणून हे एकप्रकारचे व्यावसायिक पुनर्वसन होते.ज्याची खरी गरज शासनाला होती.

    नवी मुंबई शहर निर्मिती म्हणजेच सरकारी पर्यावरण उधवस्तीकरण होय. त्यासाठी इथल्या भूमिपुत्रांना पर्यावरण विरोधी म्हणणे हे चोराच्या उलट्या बोबा आहेत.मनुस्मृती नुसार धर्म शिक्षण सत्ता व्यापार हे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या उच्चवर्णीय लोकांसाठी आरक्षित ठेवायचे.सेवा स्वच्छता मजुरी हे शूद्राती शूद्र जातींना जबरदस्तीने लादायचे, वर त्यांना हलके शूद्र अतिशूद्र घाणेरडे अस्पृश्य म्हणायचे? हा नीच नालायकी दृष्ठीकोण स्वतःस जन्माने श्रेष्ठ म्हणवून घेणाऱ्या आणि आम्हास भूमाफिया रेतीमाफिया पर्यावरण विरोधी म्हणणाऱ्या मनुवादी लोकांचा आधुनिक मीडिया प्रचार आहे.आज शिवसेना उपनेत्या आदरणीय सुषमा ताई अंधारे यांनी गणेश नाईक हे दगड खाणीच्या माध्यमातून पर्यावरणाचा नाश करणारे माफिया आहेत. म्हणून पर्यावरण प्रेमी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना राजकीय दृष्ठ्या हद्दपार केले असे वक्तव्य केले. अर्थात यात दस्तुरखुद्द बाळासाहेब ठाकरे यांना आणि सुषमाताई यांनाही कुणी ओबीसी विरोधी उच्चवर्णीय पर्यावरणवादी लोकांकडून अर्धवट माहिती दिली गेली आहे?

    गणेश नाईक हे माझे नेते किंवा नातेवाईक नाहीत. मला एका ब्राह्मणी व्यक्तीच्या सांगण्यावरून शिक्षकी पदावरून त्यांच्याच शाळेतून काढणारे माझ्या आवडत्या शिक्षकी पैशातून उध्वस्त करणारे सरंजामी नेते आहेत. तरीही त्यांचा जातबंधु ओबीसी कार्यकर्ता म्हणून त्यांच्या विषयी करुणा येऊन सत्य सांगणे हे माझे कर्तव्य समजतो. या एकूण 94 दगडखाणीत सारे आगरी कोळी कराडी सिडको प्रकल्पग्रस्त आहेत.त्यात बंद पडलेली एक दगदखाण माजी मंत्री गणेश नाईक यांच्या नावे आहे.शिवसेनेतील बिनीचे शाखाप्रमुख विभागप्रमुख आमदार हे आगरी कोळी भंडारी होते त्यांनी सेना उभी केली.

    मुख्यमंत्री गृहमंत्री महसूल मंत्री या सत्तास्पर्धेत मराठा ब्राह्मण लोकांनी ओबीसी लोकांच्या बदनामीची जी षड्यंत्रे केली त्यात छगन भुजबळ गणेश नाईक हे कुणी संपविले ?हे मी नेहमीच सांगत असतो.या दोन्ही नेत्यांना पैशाची सूज आल्याने माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांचे बोल यांना पचणारे नाहीत.

    शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे जरी महाराष्ट्राला वंदनीय असले तरीही सामाजिक न्याय, आरक्षण यात ओबीसी शिवसैनिकांना कधी समजून न घेतलेले नेतृत्व होते. म्हणूनच नवी मुंबई विमानतळ नामकरण आंदोलनात हिंदुहृदयसम्राट या उपाधीचा रस्त्यावरच्या प्रकल्पग्रस्त लढ्याचे नेतृत्व करणारे लोकनेते दि बा पाटील या ओबीसी नेतृत्वाने त्यांचा मरणोत्तर जाहीर पराभव केला.अर्थात मागासवर्गीय लढ्यात यापुढे हिंदुत्व ही कालबाह्य विचारसरणी झालीय.

    गणेश नाईक यांना संपविण्याचा डाव पर्यावरणाचा पवित्रा घेऊन उच्चवर्णीय लोकांनी आखला. त्यात आमच्या आगरी कोळी दगडणखाण प्रकल्पग्रस्तांचा बळी घेतला गेला.हे शिवसेनेचेच नाही तर कॉग्रेस राष्ट्रवादी भाजप यातील मराठा ब्राह्मण वैश्य सीकेपी यांचे कुटील राजकारण आहे. महाराष्ट्रातून आलेल्या भटक्या भूमिहीन ओबीसी एससी एसटी दगडखाण कामगारात आम्हा मागासवर्गीय कष्ठकरी लोकांचे संसार उध्वस्त करण्याचे राजकारण शिवसेनेकडून झाले असेल?.तर रयतेच्या स्वराज्याचा विचार मांडणाऱ्या छत्रपती शिवरायांचा घोर अपमान होतोय.

    2026 पर्यंत या प्रकल्पग्रस्त पुनर्वसन म्हणून दिलेल्या दगड खाणींची जिल्हाधिकारी परवानगी आहे. वनविभाग पर्यावरण यातही आगरी कोळी लोकांना उध्वस्त करण्याचे राजकारण शिजत असेल तर ते वाईट आहे. वन विभागाच्या या शासकीय जागेतील दगडखाणींसाठी रोहा रायगड येथे 346एकर जागा स्वतः खरेदी करून ती वनविभागास दिली. आगरी कोळी दगड खाण मालक संघटनेचे सरचिटणीस नामदेव ठाकूर यांनी त्याचवेळी सांगितले होते. यावर वृक्ष लागवडीसाठी 1 कोटी 4 लाख रुपये सिडको मार्फत दिले होते. असे गुगल सांगते.त्याचप्रमाणे या जागेचे बाजार भावा प्रमाणे मूल्यही वनखात्याच्या अदा केले होते.या सर्व प्रकारात गणेश नाईक नाही तर इथला शिवसैनिक आगरी कोळी ओबीसी बांधव भरडला गेलाय.

    शिवसेना ही पर्यावरण वादी असती तर मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मलवाहिन्या शुद्धीकरण प्रकल्प राबवून गटारे शुद्ध करून ते पाणी आमच्या सागरी शेतीत सोडले असते.सारे जग या बाबतीत जागे असताना छत्रपती शिवरायांचा आरमारी समुद्र शिवसेनेच्या मशाल आणि ढाल तलवार या दोन्ही गटांनी नासविलाय हे महापाप आहे.मच्छीमारांची रोजी रोटी संपविण्याचे हे पातक कसे साफ करणार? म्हणे पर्यावरण वादी.कोस्टल रोड प्रकल्पात मच्छीमारी व्यवसाय उध्वस्त करून माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे 2013 च्या कायद्यांच्या अंतर्गत हक्काचे मच्छीमार पुनर्वसन नाकारतात ?हे कोणते स्वप्न?.यात मुंबईतील पर्यावरण वादी कोस्टल रोड मध्ये पर्यावरणाच्या नावावर 17 याचिका टाकतात त्या ठरवून हरतात.यात मच्छीमार बाधित प्रकल्पग्रस्त आगरी कोळी लोकांचा उल्लेखही नाही.हा कोणता महाराष्ट्र आहे? शिवरायांचा की मनुवादी चक्रम लोकांचा?

    अलीकडे सारें मच्छीमार पुनर्वसनासाठी कोर्टात जाणार, म्हणून जेएनपीटी प्रकल्पग्रस्त लोकांना 95 कोटी रुपये देण्याच्या बातम्या सिडको ओ एनजीसी जेएनपीटी च्या माध्यमातून पर्यावरण वादी पेरतात. 200 रुपये रोजाच्या हिशोबाने आम्हाला पैसे देणार? असे कोणत्याही कोर्टात लेखी आदेश नसताना या पर्यावरण वादी लोकांना अफवा पसरविण्याचे अधिकार काय?.ज्यांच्या बोटीची किंमत 1 ते दीड कोटी रुपये त्यांना रोजगार धंदा संपविण्याची नुकसान भरपाई 200 रुपये रोजीने देणारे लोक किती क्रूर आहेत.आम्ही देशाला अब्जावधी रुपयांचे परकीय चलन मिळवून देतो.वारे पर्यावरण वादी पगारी मारेकऱ्यांनो?.

    आज परंपरागत व्यवसाय संपविले जात असताना केवळ पर्यावरण विनाशावर बोलून आगरी कोळी भंडारी कराडी गाबीत या सागरपुत्र आरमारी लोकांची सायन वर्सोवा कोळीवाडा गावठाणे शिवसेनेच्या महानगर पालिका पोलीस प्रशासनाने तोडलीत.मुंबई मासळी बाजार मातृसत्ताक अर्थव्यवस्था देऊन साऱ्या जगास आदर्श ठरलेल्या आमच्या आया बहिणी, परंतु आज बेकायदेशीर पणे घरे उध्वस्त केलेल्या सायनच्या वीणाताई केणी,वर्सोवा येथील भंडारी माशेलकर आई, शारदा आई नाखवा यांना प्रबोधन यात्रा काढून भेटा सुषमा ताई!

    जय भीम! जय महाराष्ट्र!!

    ✒️सुलोचनापुत्र:-राजाराम पाटील,केगांव,उरण जिल्हा – रायगड.(मो:-828631463)