भारतीय विद्यार्थी मोर्चा च्या प्रयत्नांना यश

32

🔹”उमरखेड-चिल्ली – इजारा ” बससेवा सुरू

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.18ऑक्टोंबर):-देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना 15 ऑगस्ट 2022 रोजी भारतीय विद्यार्थी मोर्चा चे दक्षिण भारत प्रभारी, विद्वान केवटे यांच्या नेतृत्वात, चिल्ली, चुरमुरा, दगडथर, येथील विद्यार्थी, युवकांनी भारतीय विद्यार्थी मोर्चा द्वारे शालेय विद्यार्थ्यांना बस सुविधा सुरू करण्यासाठी उमरखेड आगार व्यवस्थापकांना निवेदन दिले होते.

उपरोक्त क्षेत्रात नवीन रस्ते बांधलेले असताना सुद्धा विद्यार्थी, पालक, मजूर, व्यापारी यांना तालुक्याला येण्यासाठी बस उपलब्ध नव्हती. ज्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता.

भारतीय विद्यार्थी मोर्चा ने केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे दि.15/10/2022 रोजी ही बससेवा सुरू झाली.
ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या यशस्वी संघर्षाबद्दल सर्वत्र भारतीय विद्यार्थी मोर्चा उमरखेड युनिटचे आभार व्यक्त केले जात आहेत.

“भारतीय विद्यार्थी मोर्चा सदैव विद्यार्थ्यांच्या संविधानिक हक्क अधिकारांच्या सन्मानार्थ संघर्षरत राहील.

राज्य परिवहन महामंडळ उमरखेड आगार च्या व्यवस्थापकांनी तात्काळ सदर मागणी लक्षात घेऊन सहकार्य केल्याबद्दल, भारतीय विद्यार्थी मोर्चा ने धन्यवाद व्यक्त केले.”

या आंदोलनाच्या यशस्वितेसाठी भूषण पठाडे,साहिल रोकडे, ऋषीकेश देवसरकर, निखिल थोरात,संदेश पठाडे,सुहास मूनेश्वर,राम आडे,सचिन जाधव यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.