सुर्योदय कराटे क्लब येथील मुलांचे सुयश

18

✒️कारंजा प्रतिनिधी(पियूष रेवतकर)

कारंजा(घा)(दि.19ऑक्टोबर):-नुकत्याच झालेल्या कराटे बेल्ट एक्झाम मध्ये सूर्योदय मार्शल आर्ट कराटे ट्रेनिंग स्कूल कारंजा येथील विद्यार्थ्यांनी उत्तम प्रदर्शन करून यश प्राप्त केले.ही कराटे बेल्ट परीक्षा आंतरराष्ट्रीय कराटे प्रशिक्षक मज़हर एस. खान यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली होती.महाराष्ट्र पोलीस कराटे प्रशिक्षक मुकेश ठाकरे तसेच सहकारी प्रशिक्षक निलेश घाटवडे यांच्या उपस्थितीत मॉडल कॉलेज कारंजा घा. येथे मुलांची परीक्षा संपन्न झाली.या परीक्षेमध्ये हिमांशू माहुरे, सर्वश्री नासरे यांनी ग्रीन बेल्ट प्राप्त केले व मोरया गोंडे, प्रतीक घागरे, प्रणय घागरे, गौरव गौरखेडे यांनी ऑरेंज बेल्ट प्राप्त केले.

तसेच तन्मय कलंबे, ऋग्वेद सानेसार, यश सलाम, खुश सोनबरसे, अजिंक्य देशमुख, कोमल भांगे, अनुरूप गवई, खुशी खडककर, लावण्या मुने, रुद्र कावडकर, चेतना भिसेन, प्राची मोकद्दम , मोहित नासरे, सोहम राऊत, भाग्याश काळे, यश काळे यांनी येलो बेल्ट प्राप्त केले. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करून यश मिळविले यानिमित्त त्यांना प्रशिक्षण देणारे स्थानिक कराटे प्रशिक्षक मंगेश गाडरे, पिंटू सावरकर,कुणाल दुर्गे, संदिप काशीकर यांचे उत्कृष्ट प्रशिक्षण दिल्या बाबत अभिनंदन करण्यात आले.