ओबीसी सुतार बांधवांनो,प्रथम संघ शक्ती निर्माण करा!

27

मार्शल सुतार ग्रुपवरील माझ्या समाज लिखाणाची खऱ्या अर्थाने बाग फुलवीणारे सागरजी तायडे साहेब आणि मालक,संपादक पत्रकार बंधुचे मनपूर्वक धन्यवाद जाहीर आभार मानतो.ओबीसी सुतार समाजाच्या नेत्यांना प्रमोद सूर्यवंशी रिकामटेकडा दिड शाहणा वाटत होता.त्यांच्या लिखाणाला कोणीच वैचारिक उत्तर देत नव्हते.किंवा चर्चा सुद्धा केली जात नव्हती. त्यामुळे राज्यातील अनेक वृत्तपत्रात लेख प्रसिद्ध होत असल्यामुळे सुतार समाजांच्या कार्यकर्त्यात आणि नेत्यात मोठी उलथापालथ होत होती. याचे लेख कसे प्रसिद्ध होतात हाच मोठा प्रश्न त्यांच्या समोर होता.समाज बांधवांना सांगितल्या जात होते.कि त्या प्रमोद सूर्यवंशी याची लायकी नाही त्याचे लेख कशाला प्रसिद्ध करता.ह्या सुचना किंवा आदेश दिल्या जात होते.पण कुठे काय?. एक वेळ अशी होती की, मि असलेल्या,नसलेल्या सुतार समाज सोशल मीडियावर माझी पोस्ट शेअर करण्यास समाज बंदी असायची.

वास्तविक माझं समाज लिखाण सामाजिक क्षेत्रातील विविध विषयांवर असते.माझं लिखाण व्यक्तिपूजा करणाऱ्या,व्यक्तीभोवती फिरणार नसते.माझ्या समाज लिखाणात व्यक्तिगत उल्लेख शक्यतो मी टाळत असतो त्याची काळजी घेत असतो कारण मी व्यक्तिपूजेला मानत नाही.मी सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक,राजकीय धार्मिक क्षेत्रात व्यक्तिपूजा मानत नाही आणि मानणार नाही.सामाजिकच नव्हे तर सर्व क्षेत्रात व्यक्ति पुजेला महत्व दिले नाही पाहिजे.यावर मी ठाम आहे.मी म्हणण्यापेक्षा आम्ही म्हटले,लिहले तर समाज बांधव आणि इतर समाजाचे बांधव मैत्री करू शकतात.हे मला आज माझे समाज लिखाण राज्यभरातील विविध वृत्तपत्रात लेख प्रसिध्द होतात त्यामुळेच कळते. ज्या माझ्याच समाजात माझं समाज लिखाण सोशल मीडियावर शेअर करायला बंदी याला संकुचित समाज वृत्ती म्हणता येईल.आपल्याला आपल्याच स्वसमाजात समाज अपमान निदान एकवेळ तरी अनुभवयास हवा नाही का,अपमान झाला तरी लिखाण जिद्दीने सुरु ठेवले अगदी सभ्य भाषेत आणि संवैधानिक पध्दतीने.

गर्व से कहो हम हिंदू है!. हा नारा देणारे शेटजी व भटजी यांच्या कडून मागासवर्गीय हिंदु ओबीसींना सांगितले जाते की आपल्याला आरक्षणामुळे माजलेल्या बौद्ध समाजाला धडा शिकवायचा आहे. आरक्षण नष्ट केले की बौद्ध समाजाचा माज उतरवता येईल.मग ओबीसी टाळ्या थाळ्या दिवे लावून घंटा वाजवून चेकाळतो.बौद्धांची जिरवायची म्हणून.पण झाले काय हिंदु ओबीसींचे आरक्षण शेटजी व भटजी ने पहिले नष्ट केले.हिंदु ओबीसी आनंदित कारण बौद्धांची जिरवायची आहे. मंडल आयोग हा ओबीसींचा आहे.हे अजूनही हिंदु ओबीसींना माहीत नाही. त्या अज्ञानी अंधभक्तांकडुन दुसरी अपेक्षा करु शकत नाही. त्यांना हे ही माहित नाही की हिंदु धर्मात हिंदु ओबीसींना शुद्र म्हटले जाते.मग शेटजी भटजी हिंदु एस सी,हिंदु एस टी,हिंदु भटके ना सांगतो आपल्याला आरक्षण नष्ट करायचे आहे.कारण बौद्धांची जिरवायची आहे.हिंदू एस सी,हिंदु एस टी,हिंदु भटके टाळ्या थाळ्या दिवे लावून घंटा वाजवून चेकाळतो.पण या सर्वांना माहीत नाही.

की गर्व से कहो हम हिंदू है! या नाऱ्यामुळे फक्त आणि फक्त शेटजी भटजी यांचाच फायदा होतो आहे.म्हणजे शेटजी भटजी ने वरील मागासवर्गीय हिंदु समुहाला हिंदु म्हणुन हाक देऊन फक्त आणि फक्त शेटजी व भटजी चाच फायदा करून घेतला.आज शेटजी व भटजी पाची उंगलिया घी में डालकर देश को लुटकर बर्बाद कर रहा है! तरी बौद्धांची जिरवायची म्हणून टाळ्या थाळ्या दिवे लावून घंटा वाजवून तेही आनंदित.अंधभक्त झालेल्या मागासवर्गीय हिंदु म्हणजे ओबीसी,एस सी,एस टी, भटके समाज यांची सुद्धा जिरवली जात आहे. हे त्यांना दिसत नाही.गॅस सिलिंडर पेट्रोल डिझेल महाग केले.झळ फक्त बौद्ध व मुसलमान यांना बसत आहे काय?.

मागासवर्गीय हिंदुंना सुद्धा याची झळ बसत आहे.पण टाळ्या थाळ्या दिवे लावून घंटा वाजवून आनंद साजरा करणारा मागासवर्गीय हिंदु समाज बौद्धांची व मुसलमानांची जिरवायची म्हणून बहोत खुष है! बहोत खुष है! बहोत ही बहोत खुष है! या सर्वांना जेव्हा ब्राम्हणी हिंदु धर्माचा मागासवर्गीय हिंदु बरोबर बौद्ध व मुसलमान यांना गुलाम लाचार करण्याचा कार्यक्रम आहे हे लक्षात येईल तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. तेव्हा मागासवर्गीय हिंदु ना हात चोळत बसण्या शिवाय गत्यंतर नाही.शेटजी भटजी यांच्या मोहजाळात फसुन मागासवर्गीय हिंदु म्हणजे ओबीसी, एस सी, एस टी,भटके हे त्यांच्या भावी पिढ्यांना शिक्षण बंदी, रोजगार बंदी,हक्क अधिकार बंदी. गुलाम बनवून हिंदु राष्ट्राच्या भ्रामक कल्पनेने नरक यातना भोगायला लावणाऱ्या परिस्थितीत ढकलत आहेत. महात्मा फुलेंनी सांगितले आहे.ब्राम्हण तुमच्यावर राज्य करतो.कारण तुमच्या अज्ञानामुळे.

“मती विना निती गेली!
निती विना गती गेली!
गती विना वित्त गेले!
वित्ता विना शुद्र खचले!

एवढा अनर्थ एका
अविद्येने केला.” हा ओबीसी समाजातील महात्मा ज्योतीबा फुलेनी दिलेला क्रांतिकारी संदेश महारांचे बौद्ध झालेल्या लोकांनी स्वीकारला म्हणूनच आज ब्राह्मणांच्या बरोबरीने शिक्षणात बौद्धांचे प्रमाण आहे,हे ओबीसी नां दिसत नाही. सरकारी नोकरीत ब्राह्मणांच्या वरचढ अधिकारी बौद्ध समाजातील आहेत.पण धर्मसत्ता,राजसत्ता ब्राह्मणांच्या नियंत्रणा खाली असल्यामुळे सरकार कोणाचे ही असो शासन प्रशासनावर ब्राह्मणांची पकड मजबूत आहे.त्यांचे नेतृत्व भारतीय मजदूर संघ ही मनुवादी विचारांची राष्ट्रीय ट्रेंड युनियन करते,ती आर एस एस प्रणित असल्यामुळे या कानाचे खबर त्या कानाला होत नाही. हेच ओबीसी नां माहिती नाही. मान्यवर कांशीराम यांनी “जिसकी संख्या भारी उतनी उसकी भागेदारी” हे सांगुन त्यांच्या या धर्मसत्ता राजसत्तेचा सुरुंग लावला होता. त्यामुळेच उत्तर भारतात ओबीसी मुलायम सिंग यादव,लालूप्रसाद यादव यांनी ओबीसी ला न्याय मिळवून देण्यासाठी मंडल आयोगाची जनजागृती केली होती.त्याला लालकृष्ण अडवाणी यांनी रामाचे कमंडल बाहेर काढून राम मंदिर रथ यात्रा काढली त्यात सर्वात जास्त ओबीसी सहभागी झाले होते.हा इतिहास ओबीसी कार्यकर्ते नेते समाजाला सांगत नाही.म्हणूनच त्यांना बौद्ध,मुस्लीम आरक्षणा मुळे ओबीसी वर अन्याय होतो हे सांगितले जाते. आणि ओबीसी स्वताला हिंदू म्हणून घेतो आणि पूर्णपणे फसतो आहे.

ओबीसी सुतार समाजात अनेक सामाजिक संघटना आणि सामाजिक संस्था कार्यरत आहेत आणि त्यांचा विस्तार हा राज्यभरात तालुका पातळी ते जिल्हा पातळी ते थेट राज्यस्तरीय विस्तारित आहे याची मला थोडीफार सुतार कल्पना आहे.जिल्ह्यातील आणि राज्यातील ओबीसी सुतार समाज बांधवांचा प्रचंड असा हजारोंच्या संख्येने प्रतिसाद नक्कीच मिळणार याची मला समाज खात्री आहे.आमच्या मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यातील अर्थात ऐतिहासिक जिल्ह्यातील ओबीसी सुतार समाज जागरूकता अभियान कार्यक्रम कधी याची तारीख कळवा आपल्या स्वागताची जय्यत तयारी करतो.म्हणूनच लिहतो ओबीसी सुतार बांधवांनो प्रथम संघ शक्ती निर्माण करा.
ओबीसी सुतार समाजात ओबीसी जागरुकता अभियान राबविणे गरजेचे आहे असे मला वाटते त्यासाठी सर्वांनी निपक्ष,निर्भीडपणे सहकार्य,करावे.हीच अपेक्षा.कार्यकर्त्यांचे नेत्यांनी जरुर ऐकावे परंतु,एखाद्या वेळी नेत्याचा दांभिकपणा उघड होण्याची शक्यता नाकारता येणार नाही त्यासाठी आवश्यक असते नैतिकतेचे व वैचारिकतेचे पालन करणे.जो स्वतः खोटं आभासी प्रयोग स्वीकारेल त्याचा आदर्श तसाच निर्माण होईल व खोट्याचा आभासी परिणाम होईल.सत्य स्वीकारा,समाजाने जनतेने सुद्धा चिकित्सा व समीक्षा करावी.डोळे बंद करून मेंढरा सारखे एकामागे एक पळू नये. आपली स्वतःची आणि इतरांची सुद्धा दिशाभूल टाळा. त्यासाठी ओबीसी सुतार बांधवांनो प्रथम संघ शक्ती निर्माण करा.

✒️प्रमोद सुर्यवंशी(चिखली,मातृतीर्थ बुलडाणा)मो:-8605569521