बडनेरा बसस्थानक परिसरात रासेयो द्वारे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता आणि एचआयव्ही बाबत जनजागृती

33

✒️बडनेरा(पुरोगामी न्युज नेटवर्क)

बडनेरा(दि.20ऑक्टोबर):- येथील प्रा राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनॅजमेन्ट, बडनेरा येथील राष्ट्रीय सेवा योजना आणि रेड रिबीन क्लबद्वारे महाराष्ट्र शासन आणि रासेयो संगाबाअवि द्वारे दिनांक १९ ऑक्टोबर २०२२ रोजी भव्य स्वच्छता अभियान घेण्याचे निर्देशित करण्यात आले होते. त्यानुसार महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना आणि रेड रिबीन क्लबच्या विद्यार्थ्यांद्वारे बडनेरा येथील बस स्थानक परिसरात प्लास्टिक निर्मूलन उपक्रमा अंतर्गत बस स्थानक दर्शनीय परिसरातील कचरा प्लास्टिक बॉटल्स जमा केला व जमा केलेल्या कचऱ्याची विल्हेवाट महानगर पालिकेच्या स्वच्छता विभागाशी संपर्क करून लावावी हि विनंती करण्यात आली.

त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांनी परिसरात ठीक ठिकाणी भेट देऊन स्वच्छेतेविषयी माहिती दिली तसेच आगारात येण्याऱ्या बस मध्ये चडून विद्यार्थ्यांनी प्रवाश्यांना स्वच्छेतेबाबत जागृत करीत एचआयव्ही बाबत जनजागृती केली.

सादर उपक्रमाला बस स्थानक आगार व्यवस्थापक श्री सचिन आगरकर, श्री. पोटदुखे साहेब, श्री गोरे, श्री राजू सानप यांनी उपस्थित राहत शुभेच्छा दिल्या. महाविद्यालय तर्फे प्रा आशिष सायवान, प्रा अतुल डहाणे, प्रा अपर्णा खैरकर, प्रा अनुराधा इंगोले तसेच रासेयो स्वयंसेवक यांनी कर्यक्रमाची आखणी करीत उत्कृष्ठ रित्या पार पडला.

कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनाकरता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एस. अली यांचे मार्गदर्शन लाभले तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ. नितीनजी धांडे, कोषाध्यक्ष प्रा. हेमंतजी देशमुख, सचिव श्री. युवराजसिंगजी चौधरी, सदस्य श्री. शंकरराव काळे, श्री. नितीनजी हिवसे, सौ. रागिनीताई देशमुख, डॉ. सौ. वैशालीताई धांडे व डॉ. सौ. पुनमताई चौधरी यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले