गरीबाची दिवाळी गोड करण्याची सरकारची घोषणा हवेत:- पियूष रेवतकर

18

✒️वर्धा(पुरोगामी न्युज नेटवर्क)

वर्धा(दि.20ऑक्टोबर):- महाराष्ट्र सरकारने गरिबांची दिवाळी गोड करण्याची घोषणा हवेत असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे पियूष रेवतकर यांनी दिली.सरकारने शंभर रुपये मध्ये रवा,साखर, गोडतेल व इतर वस्तूच कॅम्बोपॅक देऊन दिवाळी गोड करण्याची घोषणा केली त्यावर मोठी प्रसिध्दी ही मिळवली मात्र प्रत्यक्षात दिवाळी चार दिवसांवर आलेली असताना कोणतीच कार्यवाही केलेली दिसत नाही. गोरगरीब या दिवाळी करिता कॉम्बोपॅक कधी मिळणार यासाठी स्वस्त धान्य दुकान मध्ये चौकशी करत आहे. प्रत्यक्षात स्वस्त धान्य दुकान मध्ये हे कॅम्बोपॅक अजून ही उपलब्ध करून दिलेले नसल्याने गोरगरीब नागरिक मोठा संताप व्यक्त करत आहे.

आज महागाई ने कंबरडेच मोडले आहे शेतकरी अतिवृष्टी मुळे व्यथित झालेला आहे. संपुर्ण खरिप हंगाम पाण्यात गेला आहे. सोयाबीन, बाजरी, मका ,कपाशी , कडधाण्यासह या पिकांची खूप नासाडी झालेली आहे. फळबागा उध्वस्त झालेल्या आहे. शेतकऱ्यांनी विविध बँकांचे कर्ज घेऊन ही पिके मोठ्या कष्टाने उभी केली होती अतिवृष्टीत या पिकाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात आहे.शासनाकडून पंचनामे देखील करण्यात आले.

अतिवृष्टी होऊन आज जवळपास एक महिना होऊन अजूनही कोणतीही मदत सरकारकडून शेतकऱ्यांना देण्यात आली नाही. सणासुदीचे दिवस तोंडावर असताना सरकार मात्र घोषणाच करत आहे. पण यावर प्रत्यक्षात कार्यवाही कधी होणार यावर लक्ष लागून आहे.अजूनही सरकारच्या गरिबाची दिवाळी गोड करण्याची घोषणेची व अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत केल्याची कुठेही अंबलबजावणी दिसत नाही म्हणजेच गोरगरिबांच्या व शेतकऱ्यांच्या तोंडाला सरकारने पाने पुसली असून सणासुदीला त्यांना लाऊन एकप्रकारे थट्टाच केली असून सरकारने आश्वासन पूर्ती केली पाहिजे असे मत पियूष रेवतकर यांनी व्यक्त केले.