शरद पवार यांचेविषयी अनेकांनी कौतुक केले.काहींनी खंत व्यक्त केली.कि पवार साहेब मोदींच्या उंचीपर्यंत जाऊ शकले नाहीत.मराठी लोकांनी त्यांना जाणले नाही.जाणता राजा म्हणतात पण राजाला जाणले नाही.अशी ती खंत.पवार साहेब क्रियेटीव्ह माईंडेड परसन आहेत.नेहमीच नवीन नवीन उपक्रम करतात.आणि राबवतात ही.आणि लोक मात्र त्यात अडथढा आणतात.उपक्रम तसाच राहून जातो.१९७८ला पवार साहेबांनी प्रथमच नवीन पराक्रम केला.वसंत दादांच्या सरकार मधून आमदार फळी मोडून भाजप सोबत घेऊन पुलोद सरकार बनवले.पुरोगामी लोकशाही दल.सनातन पक्षाला सोबत घेऊन पुरोगामी दल.हा अवचित, अचंबित ,अवघड प्रयोग केला.तेथून त्यांची प्रदेश व राष्ट्रीय राजकारणात एन्ट्री झाली.पण ती प्रतिमा,ती ओळख आयुष्य भर पाठलाग करीत राहिली.तो खंजीर धुवून काढता आला नाही.,तो दांव विसरता आला नाही तो दाग पुसून काढता आला नाही.हे दुर्भाग्य.कारणे शोधली पाहिजे.
नरेंद्र मोदी शरद पवारांपेक्षा नंतर राजकारणात उतरले.सतत तेरा वर्षे सक्षम व यशस्वी मुख्यमंत्री राहिले.ती परीक्षा उत्तीर्ण झाल्यानेच त्यांना प्रधानमंत्रीपदाच्या परीक्षेचे हॉल तिकीट दिले गेले.येथे आमचे पवार साहेब अपुरे पडले.ते चार वेळा मुख्यमंत्री झाले.पण एकदाही पुर्ण पांच वर्षे राहिले नाहीत.मुख्यमंत्री असतांना निवडणूक झाली.एकदाही पुर्ण बहुमताने सत्तेवर आले नाहीत.नंतर तडजोड,सांधमोड करूनच मुख्यमंत्री बनले.मोदींना अशी गठबंधन ची गोधळी विणावी लागली नाही.याची ही कारणे शोधली पाहिजे.
पवाराचा खूप मोठा गोतावळा आहे.लोकसंग्रह आहे.कला संग्रह आहे.धन संग्रह आहे.पण सत्संग कमी पडला.प्रामाणिक जनतेची अवहेलना झाली आहे. त्यामुळे पुढील युद्ध जिंकणे शक्य झाले नाही.म्हणून पुन्हा स्वबळावर कधीच मुख्यमंत्री झाले नाहीत.प्रधानमंत्रीपदाचा विचार याच दिशेने पुढे करता येईल.
राजा लढा देतो.सैनिकांवर विश्वास ठेवावा लागतो.त्यासाठी सैनिक सुद्धा प्रामाणिक हवेत.नाहीतर ज्याला जे हाती आले ते पळवून नेणारा सैनिक नको.पवारांचे सरदार यांनी हेच केले.जे हाती लागले तेच पळवून नेले.ते रयतेशी प्रामाणिक राहिले नाहीत.त्यांनी रयतेला लुटून घबाड भरले.नंतर पकडले गेले.जेलमधे गेले.नामुष्की झाली.आता याच हाताळ,भुरट्या,उचल्या, बदनाम झालेल्या सरदारांना घेऊन पवार साहेब पुढील लढाई जिंकू शकतील का ?
छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणतात.तिच उपाधी शरद पवारांना देत असाल तर तुलना करावीच लागेल.महाराज सैनिकांना म्हणत,शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लावू नका.आणि येथे तर पवारांच्या साथीदारांनी देठ,पात,कंद मुळासकट उपटून पळवले.पवारांनी कधीच विरोध केला नाही.छगन असे करू नकोस.अनिल असे करू नकोस.नबाब असे करू नकोस.अजित असे करू नकोस.राजेश असे करू नकोस.सुनिल असे करू नकोस.विजय असे करू नकोस. असे कितीतरी नांवे सांगता येतील कि, पवारांनी फर्मावले पाहिजे होते, कोणाच्या शेतातील कांदे,बटाटे,वांगे चोरुन आणू नकोस.कोणाची जमीन चोरू नकोस.बोगस स्टॅम्प विकू नकोस.डान्सबार मधून हप्ते मागू नकोस.कोरोनाचा निधी चोरू नकोस.आपण रयतेची सेवा करण्यासाठी राजपाट चालवत आहोत.रयतेला लुटून घबाड भरण्यासाठी नाही.पण येथे चोरीला वर्ज्य नाही.हेच रयतेला मान्य नाही.
महाराष्ट्रात गो .रा खैरनार हे आदर्श प्रशासक झाले.पवार साहेबांना कधीच आवडले नाहीत.महाराष्ट्रात आण्णा हजारे हे आदर्श समाजसेवक झाले.पवार साहेबांना कधीच आवडले नाहीत.यांना कधीच जवळ केले नाही.कारण हे प्रामाणिक होते.कर्तव्यनिष्ठ होते.हे स्वयंसिद्ध होते.हे करारी होते.हे लोकांच्या गळ्यातील ताईत होते.लोकांचा समज झाला कि, पवार साहेबांना प्रामाणिक माणसे आवडत नाहीत.जातीपातीचे राजकारण करीत नाहीत असे म्हणतात .पण खडसेंना पक्षात घेऊन जातीची गोळाबेरीज करण्याचा प्रयत्न केला आहे.हे कधीही नाकारता येणार नाही.आमच्या जळगाव जिल्ह्यात आणखी काही प्रामाणिक साथीदार होते, तरीसुद्धा.नाशीक जिल्ह्यात भुजबळ शिवाय दुजा कोणी प्रामाणिक माणूस नाही.जळगांव जिल्ह्यात खडसेंशिवाय दुजा कोणी प्रामाणिक नाही.ज्याला विधानपरिषदेत सदस्य बनवू शकले असते.आवड तशी निवड.
नरेंद्र मोदींशी तुलना करीत असाल तर महाराष्ट्र पुरते बोलू.मोदींचे अनुयायी देवेंद्र फडणवीस यांच्या सारखा एकहाती युद्ध करणारा कोणी योद्धा पवार साहेबांकडे आजही नाही.काल ही नव्हता.
✒️शिवराम पाटील(९२७०९६३१२२)महाराष्ट्र जागृत जनमंच,जळगाव