अपंगत्व आणि गरिबी यावर मात करीत एक दिवस स्वतःचे ध्येय निश्चित पूर्ण करणार-जिल्हाध्यक्ष स्वप्निल गोरे!

16

✒️यवतमाळ(पुरोगामी न्युज नेटवर्क)

यवतमाळ(दि.29ऑक्टोबर):- समाजामध्ये दैनंदिन जीवन जगत असताना नेहमीच आपल्याला गरिबीची जाणीव होते तर गरिबी ही आपल्याला स्वतःकडून जाणवत नाही तर समाजातील काही दीड शहाण्या लोकांकडून आपली परिस्थिती गरीब आहे याची सतत जाणीव करून दिली जाते हे त्या स्वतःला शहाण्या समजणाऱ्या लोकांच्या बोलण्यावरून व तसेच आपल्या सोबत ते कशाप्रकारे व्यवहार करतात यामध्ये तेथे आपली लायकी दाखवतात. व हे झालं गरिबीचा उदाहरण दिव्यांगाच्या बाबतीतही असंच होतं त्यांना योग्य पाहिजे ते वागणूक मिळत नाही किंवा आपल्यापेक्षा कमी त्याला समजले जाते परंतु मी माझ्या अनुभवावरून हे सांगू शकतो की दिव्यांग व्यक्ती होता कमजोर नसतोच जरी त्याच्यामध्ये एखादा शारीरिक अपंग असेल तरीसुद्धा त्याच्यामध्ये असा एक गुण असतो की त्याच्या जोरावर ते स्वतःचे एक वेगळे अस्तित्व निर्माण करू शकतात पण हे स्वतःला शहाण्या समजणाऱ्या लोकांना कळणार नाही तो भाग वेगळा, तर दिव्यांग म्हणजे काय की त्याच्यामध्ये एखादी शारीरिक कमतरता असणे.

माझेच उदाहरण घेऊन सांगतो की मी डोळ्यांनी75% दिव्यांग आहे परंतु मी कधीही मागे हरलो नाही गरिबीने खूप थांबवण्याचा प्रयत्न केला पण माझ्या भावाच्या सहकार्यामुळे आज मी त्यावर मात करीत एक स्वतःचा अस्तित्व निर्माण करण्याकडे वाटचाल करीत आहे जरी मी दिव्यांग असेल तरीही माझ्याकडे एक असा गुण आहे की मी पूर्ण विश्वावर आपलं अधिराज्य गाजवू शकतो आणि तो म्हणजे मी एक कवी आणि लेखक आहे माझ्या कवितेच्या लिखाणातून मी माझे स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करत आहे आणि समाजामध्ये वाटचाल करत असताना मला नेहमी असं माझ्या कानी यायचं की हा काय करणार आहे गरीबाचा मुलगा आणि एक तो दिव्यांग आहे तू काय करणार?

पण त्याच व्यक्तीला मी आज सांगू इच्छितो मी आज साहित्य क्षेत्रात आपला वेगळा स्थान निर्माण करीत आहे आता कवी म्हणजे मी एक कविता लिहून किंवा हजार कविता लिहून माझा लेखन बंद जरी केलं तरी सुद्धा शेवटी माझ्या नावासमोरच कवी हे नाव कधीच मोडणार नाही कारण शेवटी कवी तो कवीच असतो व मी गरिबीवर व शारीरिक अपंगत्वावर मात करीत एक दिवस स्वतःचे निश्चित ध्येय नक्कीच प्राप्त करणार.या लेखाच्या माध्यमातून मला एकच संदेश द्यायचा आहे की आपल्या प्रॉपर्टीचा गर्व न बाळगता इतरांना आपण कशाप्रकारे मदत करू शकतो याचा विचार करा आणि समाजातील गरीब श्रीमंती पणा शक्य झाल्यास दूर करण्याचा प्रयत्न करा.
(टीप सदर लेख स्वतःच्या अनुभवावरून लिहिलेला असून जर कोणाच्या भावना दुखावल्या असेल तर क्षमा असावी)