पदोन्नती झाली पण गरज आहे तेथील शाळांना मुख्याध्यापक कधी भेटणार ?

45

🔹निकषात बसणाऱ्या सर्व शाळेवर उच्च श्रेणी मुख्याध्यापक द्या-प्रशासनाला पुरोगामी शिक्षक संघटनेचे निवेदन
——– ——————————–

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपू(दि.30ऑक्टोबर):- गेल्या तीन वर्षापासून चंद्रपूर जिल्ह्यात ९० च्या जवळपास शाळांवर उच्च श्रेणी मुख्याध्यापकांची पदे रिक्त होती . ती समुपदेशनाने तात्काळ भरण्यात यावी यासाठी महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक संघटनेने चर्चा , निवेदने व प्रसंगी आंदोलन करून प्रशासनाकडे पाठपुरावा केला .

पुरोगामी शिक्षक संघटनेच्या पाठपुराव्याची दखल घेत नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी २८ऑक्टोबर ला समुपदेशनाने उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदे भरली . परंतु जाहीर यादीत काही शिक्षक सेवानिवृत्त झाले असून ९० च्या जवळपास पात्र जागा असताना ५८ पैकी काहींनी नकार दिल्याने अर्ध्या अधिक शाळेवर मुख्याध्यापक मिळालेच नाही .

यासाठी पुरोगामी शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासन व पालकमंत्री यांच्याशी चर्चा करून ही बाब लक्ष्यात आणून दिली . पदोन्नती करून प्रशासन शैक्षणिक गुणवत्तेला हातभार लावत असताना राहिलेली त्रुटी त्वरित पूर्ण करेल , यासाठी पुरोगामी संघटना आग्रही असून , लवकरच उर्वरित जागा भरण्यात याव्या . यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत.