पहलवान तानाजी जाधव यांच्या वाढिवसानिमित्त झोपडपट्टीतील अनाथ मुलांना कपडे वाटप

    128

    ?टायगर ग्रुपचा उपक्रम

    ✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

    चिमूर(दि.2नोव्हेंबर):-महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध पहलवान, टायगर ग्रुप महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष तानाजी जाधव यांचा वाढदिवस टायगर ग्रुप चिमूर तर्फे रोहन नन्नावरे यांचे नेतृत्वात झोपडपट्टीतील अनाथ मुलांना कपडे वाटप करून साजरा करण्यात आला 

    सोलापूर जिल्हातील करमाला येथे पैलवान तानाजी जाधव यांनी टायगर ग्रुपची स्थापना केली, आणि संपूर्ण महाराष्ट्रात संघटनेचा विस्तार केला, अपघात ग्रस्तांना मदत करणे, गरजू रुग्णांना तात्काळ रक्ताची व्यवस्था करून देणे हे समाजसेवचे व्रत घेत संघटनेचे कार्य सुरू करणाऱ्या तानाजी जाधव यांचा वाढदिवस आज चिमूर येथे रोहन नन्नावरे यांचे नेतृत्वात टायगर ग्रुप चिमूरच्या वतीने शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते, युवासेना तालुका प्रमुख शार्दुल पचारे, शिवसेना तालुका संघटक रोशन जुमडे यांचे उपस्थित अनाथ मुलांना कपडे वाटप करून साजरा करण्यात आला.

    या वेळी टायगर ग्रुपचे विकास जांभूले निखिल गिरी, विशाल शिवरकर तालीम शेख, विशाल शेंडे, पवन झाडे, अजय मोहिनकर, पवन डोंगरवार, डेव्हिड मसराम, दुर्गेश हजारे, शुभम जामभूले, शिवसेना प्रसिध्दी प्रमुख सुनील हिंगनकर उपस्थित होते,