रिपाई महिला आघाडी राज्य संघटक पदी गौतमी मसणे यांची निवड; केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे हस्ते नियुक्ती पत्र प्रदान

33

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.3नोव्हेंबर):-पुणे येथे कलासागर हॉटेल मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारता राज्यमंत्री भारत सरकार मा. रामदासजी आठवले साहेब यांच्या उपस्थित संपन्न झाली. यावेळी प्रमुख उपस्थित महिला नेत्या सिमाताई आठवले, मा.सौ.शिलाताई गांगुर्डे, महिला आघाडी महाराष्ट्र अध्यक्ष मा. चंद्रकांताताई सोनकांबळे, महिला आघाडी सरचिटणीस ॲड. अभयाताई सोनवणे, मुंबई अध्यक्ष उषाताई रामलू यांच्या उपस्थित राज्यातील सर्व प्रमुख महिला पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली.

यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात महिला संघटना वाढ करणे महिला वरील अत्याचार दुर करणे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा सर्व समाजातील घटकापर्यंत पोहचवणे.

यामध्ये सातारा जिल्ह्यातील पुसेगाव येथील महिला आघाडी धडाडीच्या नेत्या मा. गौतमी ताई मसणे यांची निवड करण्यात आली यावेळी उपस्थित मुंबई मधुन सिध्दार्थ पारे, युनूस शेख, जयमाला पडळ, खटाव तालुका अध्यक्ष गणेश भोसले, सुजल मसणे , सुर्यकांत मसणे, योगेश मसणे, आरती कांबळे वनिता मसणे, ऐश्वर्या मसणे होते.