पुढील १० वर्ष ‘हर घर’ मोदीच-हेमंत पाटील

21

🔸’भारत जोडो’चा प्रभाव केवळ दक्षिणेतील राज्यात

✒️मुंबई(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मुंबई(दि.3नोव्हेंबर):-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कार्यशैली,त्यांचे प्रभावी व्यक्तिमत्व,देशाला जागतिक पातळीवर पहिल्या रांगेत घेवून जाण्याची त्यांची जिद्द आणि वैश्विक पातळीवर पंतप्रधानांच्या आंतरराष्ट्रीय मुसद्दी कामगिरीची होत असलेले कौतुक हे नरेंद्र मोदी यांच्या उत्कृष्ठ नेतृत्व क्षमतेचे द्योतक आहे.सध्यस्थितीत जगावर ओढावलेल्या संकटातून बाहेर काढण्याचे कौशल्य केवळ मोदी यांच्यातच आहे. याच दूरदृष्टी नेतृत्वाच्या बळावर पुढील १० वर्ष देशातील प्रत्येक घरात मोदीचेच नेतृत्व सर्वमान्य राहील,असे मत इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी गुरूवारी व्यक्त केले.

विरोधी पक्ष कॉंग्रेस राजकीय अस्थिरता पसरवण्यासाठी प्रयत्नरत आहे.देशात सर्वकाही आलबेल नाही, असा कांगावा करीत कॉंग्रेसने खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ‘भारत जोडो’ यात्रा काढली असली तर,या यात्रेचा प्रभाव केवळ दक्षिण भारतातील काही राज्यातच बघायला मिळतोय.कॉंग्रेसच्या काळात समोर आलेल्या हजारो कोटींच्या भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांची प्रकरणे आजही देशवासियांना लक्षात आहेत.त्यामुळे कॉंग्रेसकडून देशात दुफळी उभारण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपच्या आतापर्यंतच्या कार्यकाळात मात्र अश्या कुठलाही भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर आली नाही.

उलटपक्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजप चांगले कामे करीत संघटन कौशल्य आणि मोदींच्या प्रभावी नेतृत्वाच्या बळावर २०२४ चा मार्ग प्रशस्थ करीत आहे. देशभरातील जवळपास सर्वच बूथवर पक्ष विचारधारेने प्रभावित झालेले आणि स्वतःला पक्ष कार्यात झोकून देणारे सक्रिय कार्यकर्ते आहेत. ‘पन्ना प्रमुखां’ पासूनची व्यवस्था भाजपने कार्यान्वित केली आहे. प्रत्येक मतदार संघातील पकड, लोकांची होणारी कामे आणि सर्वसामान्यांना विनाविलंब मिळणारा न्याय ही भाजपची जमेची बाजू आहे.कुठल्याही योजनेचा निधी आता तळागाळातील लोकांपर्यंत पोहचतो. त्यामुळे मोदींनी ‘सुशासन’ ही संकल्पनेचा प्रत्यक्षात अंमलबजावणी केली आहे. कॉंग्रेस नेत्यांनी देखील हे गुण आत्मसात करण्याची गरज असल्याचे पाटील म्हणाले.