श्याम ठाणेदार यांना प्रबोधनकार ठाकरे गौरव पुरस्कार पुणे

35

✒️पुणे(पुरोगामी न्युज नेटवर्क)

पुणे(दि.7नोव्हेंबर):-मुंबईतील साप्ताहिक भगवे वादळच्या पहिल्या वर्धापनादिनानिमित्त विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा विविध पुरस्करांनी गौरव करण्यात आला. यावेळी स्तंभलेखक श्याम ठाणेदार यांना प्रबोधनकार ठाकरे गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी दैनिक मुंबई चौफेरचे संपादक प्रफुल्ल फडके, धडक कामगार युनियनचे नेते तसेच दैनिक मुंबई मित्र दैनिकाचे समूह संपादक अभिजित राणे, मुंबईचे माजी उपमहापौर स्नेहल आंबेकर, माजी आमदार बाबुराव माने, साप्ताहिक भगवे वादळचे संपादक दत्ता खंदारे आदी मान्यवर उपस्थित होते. मुंबईतील धारावी येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

यावेळी राज्यभरातील पत्रकार, संपादक व विविध क्षेत्रात काम करणारे मान्यवर मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. श्याम ठाणेदार हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध स्तंभलेखक असून ते महाराष्ट्रातील विविध वर्तमानपत्रात स्तंभ लेखन करतात. विविध विषयांवरील त्यांचे हजारो लेख विविध वर्तमानपत्रात, मासिकात व दिवाळी अंकात प्रसिद्ध झाले असून महाराष्ट्रभर त्यांचा वाचकवर्ग आहे. तसेच ते सोशल मीडियावर देखील ऍक्टिव्ह असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते नेहमीच जनजागृती करीत असतात. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन साप्ताहिक भगवे वादळने त्यांचा प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार देऊन गौरव केला आहे. श्याम ठाणेदार यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.