आगरी-कोळी विस्तारित गावठाण प्रश्न आणि कृतघ्न महाराष्ट्र सरकार?

15

आगरी, कोळी, भंडारी ईस्ट इंडियन आणि आदिवासी हे सागरपुत्र आरमारी मातृसत्ताक समाज मुंबईचे मालक आहेत. यांचे अस्तित्व असेपर्यंत गुजरात मुंबईला गिळू शकत नाही. हिंदुत्ववादी मुस्लिमांची भीती दाखवून जसे फसवे राजकारण करतात. तसे मुंबईची लूट करणारे ब्राह्मण मराठे सीकेपी गुजराती लोकांची भीती दाखवून जे राजकारण करतात तेही दिखाऊ आहे.आम्ही ओबीसी सागरपुत्र मुंबईचे मालक असताना, लग्नात हुंडा घेणारे हे पुरुषसत्ताक उच्चवर्णीय सरंजामी लोक स्वतःस मुंबईचे मालक समजतात तरी कोणत्या तोंडाने?

मुंबईत इंग्रज पोतूरगीज डच मोघल साऱ्यांच्या सत्ता आल्या तसेच मराठे ब्राह्मण सीकेपी हे मागासवर्गीय जातींचे शोषक सत्ताधारी मुंबईत आले. इथल्या भूमिपुत्र ओबीसी आगरी कोळ्यांशी निचपणे वागले. हिंदू ब्राह्मण क्षत्रिय वैश्य सीकेपी लोक त्यांचे वैर आम्ही कधी विसरणार नाही.जे परकीय सत्ताधारी विदेशी लोकांनी केले नाही ते हिंदू धर्मातील या उच्चवर्णीय सरंजामी जातींनी केले. मनुस्मृती च्या वैदिक धर्माने आम्ही जन्मतःच श्रेष्ठ आहोत हा हिटलरने मांडलेला वंश श्रेष्ठत्वाचा आधार स्वतःतील, भित्रेपणा झाकण्यासाठी या उच्चवर्णीय लोकांनी आजही स्वतःच्या मनात पाळला आहे. ही मनोविकृती या देशातील समस्त स्त्रिया ओबीसी एससी एसटी यांना कायम छळत आली आहे. यांच्यात समुद्राची पाण्याची भीती पूर्वी होती आणि आजही आहे. नाचता येईना म्हणून अंगण वाकडे? तसेच समुद्रात पोहता येत नाही.म्हणूनच समुद्र उल्लंघन निषिद्ध? हे मनुस्मृतीच्या आडून हिंदू वैदिक धर्मियांना सांगणारे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे भित्रे लोक सागरी आरमार,सागरी व्यापार यांच्या विरोधीच राहिले.म्हणून समुद्र मार्गे आलेल्या मूठभर इंग्रजांनी या शूर मराठा ब्राह्मण वैश्य लोकांना प्रत्येक लढाईत हरवून पराभूत केले.

उच्च क्षत्रिय जातींचा पराभव म्हणजे देशाचा पराभव हे खोटे दाखले देत समस्त देशाला फसवत राहिले. राष्ट्रीय स्वयं सेवक संघ या प्रखर राष्ट्रीय विचारातून उभ्या राहिलेल्या तत्वज्ञातून मा.मोदी देशाचे पंत प्रधान झाले. परंतु आपले राज्य म्हणजे गुजरात हाच भारत आहे. या कूपमनडुक वृत्तीचे राजकारण करीत आहेत. दीडशे वर्षांपूर्वी इंग्रजांनी निर्माण केलेल्या झुळत्या पुलाला जे साधा खांबांचा आधार देण्याची प्रगती करू शकले नाहीत? या घोडचूकीत कंबर भर पाण्यात दीडशे नागरिकांचे बळी देणारे? देशावर राज्य करण्याच्या लायकीचे सत्ताधारी नाहीतच.

महाराष्ट्रातील उद्योग केंद्रातील सत्तेच्या जोरावर पळविणे.हा भारतीय राष्ट्रवाद नाही.भारताची व्यापारी लूट करणाऱ्या विदेशी शत्रुत्वाने गुजरातचे मोदी शहा अदानी अंबानी वागत असतील ?.तर नवी मुंबईतील आगरी कोळी पट्ट्यातील सेझ आणि विमानतळ प्रकल्प कोणत्या राष्ट्रीय नात्याने या गुजराती स्वार्थासाठी आलेल्या व्यापारी लोकांना आम्ही चालवायला द्यायचा?.महाराष्ट्रातील कॉग्रेस भाजप राष्ट्रवादी शिवसेना यातील उच्चवर्णीय नेत्यांनी पोलिसी बळावर आगरी कोळी कराडी भंडारी लोकांच्या जमिनी लुटून याच अदानी अंबानी यांना विकल्या ही दलाली भडवेगिरी आज लपलेली नाही.या अन्यायाला आम्ही कोणत्या संविधानिक विचारांनी भारतीय राष्ट्रवाद म्हणायचा? महाराष्ट्रातील सर्वात ज्येष्ठ राजकारणी मा.शरद पवार यांनी या प्रश्नाचे उत्तर द्यावे.

मागासवर्गीय लोकांच्या जमिनीतच देश विकासाचे प्रकल्प राबविणाऱ्या ब्राह्मण मराठा वैश्य सत्ताधारी जातींनी जे आगरी कोळी भंडारी ओबीसी जातींचे शोषण केले आहे ते उघडपणे जाहीर करण्याची हीच योग्य वेळ आहे.सत्तेच्या जोरावर सर्व पुरस्कार आणि सत्तेची सुखे उपभोगणाऱ्या उच्चवर्णीय नेत्यांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ जवळ आली आहे.मुंबईच्या शहर आणि ओद्योगिक विकासासाठी आमच्या शेती मासेमारी मिठागरे रेती व्यवसायांचा बळी घेणाऱ्या नतद्रष्ट राजकारण्यांना जनाची नाही तरी मनाची लाज वाटली पाहिजे.देशातील मागासवर्गीय शूद्राती शूद्र जातींची आम्ही लूट केली आहे म्हणून प्रायश्चित्त घेणाऱ्या ब्राह्मण मोहन भागवत यांच्याप्रमाणेच मराठा वैश्य या उच्चवर्णी यांनी ही पापक्षालन करण्यासाठी महाराष्ट्राची सत्ता शोषित ओबीसी मागासवर्गीय लोकांकडे दिली पाहिजे.ते देत नसतील? तर सत्ता हाती घेण्याची दर्यादिली आम्हा आगरी कोळी कराडी ओबीसींना दाखवावीच लागेल.

मुंबईच्या जमिनी बिल्डरांना विकणे हा स्वयंविकासाचा एकमेव कार्यक्रम राबविणाऱ्या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी आता कोळीवाडे गावठाणे यांना गलिच्छ वस्त्या (SRA) म्हणावे ? हा कृतज्ञापणाचा हा कळसच झाला.या अगोदर गिरणी कामगार,झोपडपट्टीस गलिच्छ वस्ती ठरवून त्या बिल्डरला विकणाऱ्या “शिवसेनेस” विकणारी जमात स्वतःच्या कुशीत जन्म घेईल अशी पुसटशी कल्पना नसावी?. पेरले तेच उगवते.या न्यायाने यापुढे निष्ठावंत प्रामाणिक राजकीय नेतृत्व औषधालाही सापडणार नाही.इथल्या भूमीपुत्रांशी गद्दारी करणारे सत्ताधारी स्वतःच्या पोटीही गद्दारच जन्माला घालतील?.ही काळाने दिलेली चपराक सर्व राजकीय पक्षांच्या नेतृत्वाने समजून घ्यावी.अहो प्रामाणिक कार्यकर्ते मतदार या 85 टक्के मागासवर्गीय लोकांच्या सात पिढ्यातूनच जन्मले.तुम्ही पिढीजात सत्ता सांभाळताना मुंबई भारत आणि जगाशी गद्दारी करणारे पेटी खोके यांचे तत्वज्ञान घरातल्या रक्ताच्या नात्यातही रुजविलेत हे स्वतःच्या घरात डोकावून पहा.

देशात मुंबई शहराची वाढ झाली.या नैसर्गिक वाढीसाठी आम्ही आमच्या जमिनी दिल्या.नव्हे तुम्ही आमच्या आशिक्षित भोळ्या ओबीसी लोकांना विकासाचा धाक दाखवून लुटल्या.नवी मुंबईत वसंत दादा पाटील या मराठा मुख्यमंत्र्यांनी जालियानवाला बागेतील निशस्त्र भारतीय नागरिकांवर जो गोळीबार इंग्रजांनी केला.तसाच गोळीबार आगरी कोळी कराडी लोकांवर करून सिडकोसाठी जमिनी घेतल्या.महात्मा गांधींचे अहिंसक तत्वज्ञान चुलीत घालणारी कॉग्रेस हा अत्याचार विसरली काय?.सेझ प्रकरणी आमच्या जमिनी घेऊन रिलायन्सला देणारी कॉग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजप यात फरक काय? आमच्या दृष्टीने आमच्या मातृभूमीवर केलेले हे पोलिसी जबरदस्तीने बलात्कारच ना?.तुमची आणि आमची भारतमाता वेगळी आहे का?

देशाच्या लोकसंख्या वाढीस नैसर्गिक वाढ म्हणून स्वीकारताना, आमचे सर्वस्व आम्ही दिले.आज ठाणे पालघर मुंबई रायगड येथे गावाबाहेरील जमिन भारतासाठीच दिली ना?.की पाकिस्तानसाठी? आगरी कोळी भंडारी ओबीसिंचे हे योगदान तुम्ही एवढ्या लवकर विसरलात.इंग्रज सरकारने केलेले मूळ गावठाणांचे नकाशे दाखवून तेच तुमचे गावठाण हे सांगताना लाज नाही वाटली?.इंग्रजांच्या नंतर सत्ताधारी म्हणून जर तुम्ही विस्तारित गावठाण मोजू शकत नाही तर सोडा सत्ता.लायकी नाही तुमची देशाचे मालक व्हायची?
आमचे शत्रू नेहमी महाराष्ट्राच्या सत्तेत बसणारे ब्राह्मण मराठा मुख्यमंत्री आहेत. ते सत्तेत होते म्हणून त्यांची ती जबाबदारीच आहे.आम्ही इंग्रज मोघल पोतृगीज शक हुन यांना स्वातंत्र्यानंतर कसे जबाबदार धरणार? जे पाप या देशातील सत्ताधारी जातींचे आहे ते स्वीकारावेच लागेल यासाठी मोहन भागवत यांचे जाहीर आभार मी मानतो.

विस्तारित गावठाण प्रस्तावाला मान्यता मिळणार नाही. लोकवर्गणी काढून गावठाणे मोजता कशाला?.अशी न्यूनगंड गुलामीची भावना आपल्याच जात बांधवात पेरणाऱ्या नालायक आगरी कोळी बांधवाना लाख लाख दोष देताना मला खूप दुःख होतेच! परन्तु देशातील आणि महाराष्ट्रातील राज्यकर्ते प्रशासक एनजीओ यांच्यातील विस्तारीत गावठाण विरोधातील मनुस्मृती पाहून माझ्या देशाचीही लाज वाटते.भारतीय संविधानाने दिलेली जमीन जंगल पाणी समुद्र आकाश शिक्षण आरक्षण यातील समता माझ्या देशबाधवाना या लेखातून कळावी.आमची गावाबाहेर वाढलेली विस्तारित गावठाणांचे प्रस्ताव आमच्या गावकमिटीनी लोकवर्गणी काढून सर्व सहमतीने बनवावे.शासनाने त्यास सरकारी मान्यता ध्यावी.नाहीतर 2024 ला खुर्ची खाली करा.रक्तविहिन अहिंसक लोकशाही क्रांतीचे तत्वज्ञान एकविरापुत्र बुद्ध आणि कुळ कायदाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर आगरी नेते नारायण नागु पाटील,लोकनेते दि बा पाटील यांचे विचार सोबत घेऊन आम्ही लढू आणि जिंकू.

✒️सुलोचनापुत्र:-राजाराम पाटील(केगाव उरण रायगड)मो:-8286031463