विद्यार्थी दिनानिमित्त गोरगरिबांच्या मुलांना केले शालेय साहित्य वाटप

31

🔹युवा सामजिक कार्यकर्ते पियूष रेवतकर यांचा पुढाकर

✒️वर्धा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

वर्धा(दि.8नोव्हेंबर):-भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन हा दरवर्षी संपुर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो.बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन हा विद्यार्थी दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.जनकल्याण फाउंडेशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा युवा सामजिक कार्यकर्ते पियूष रेवतकर यांच्या नेतृत्वात वर्धा येथील गोरगरीब मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

१० मुलांना जनकल्याण फाउंडेशन मार्फत शिक्षणं उपयोगी साहित्य वाटप केले यात पेन,पेन्सिल, शोपणर, इरेजर व नोटबुकचा समावेश आहे.

जनकल्याण फाउंडेशन तर्फे नेहमीच महापुरुषांची जयंती, पुण्यतिथि किंवा विविध दिना निमित गोरगरीब मुलांना पुस्तके वाटप करण्यात येते.जनकल्याण फाउंडेशन संपुर्ण महाराष्ट्रात पियूष रेवतकर यांच्या नेतृत्वात सामजिक काम करत आहे.विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करतावेळी जनकल्याण फाउंडेशन टीम वर्धाचे पदाधिकारी सुदीप इंगळे, मोहित वैद्य, संदेश आत्राम उपस्थित होते.