अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज धरणगाव येथे तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न !…

40

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी. पाटील सर)

धरणगांव(दि.17नोव्हेंबर):- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव, व पंचायत समिती शिक्षण विभाग धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शासकीय तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धा अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज धरणगाव येथे घेण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँग्लो उर्दू हायस्कूलचे क्रीडाशिक्षक मुश्ताक अली सैय्यद सर यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज चे मुख्याध्यापक शेख शकीलुद्दिन सर होते.तसेच प्रमुख अतिथी म्हणून धरणगाव तालुक्याचे क्रीडा समन्वयक श्री.सचिन सूर्यवंशी सर होते.

या तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन धरणगाव तालुक्याचे क्रीडा समन्वयक श्री.सचिन सूर्यवंशी सर यांच्या हस्ते करण्यात आले.शाळेच्या वतीने क्रीडा स्पर्धेत आलेल्या धरणगाव तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.या प्रसंगी आपल्या मनोगतात सुर्यवंशी सरांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.तसेच खेळामध्ये जिंकणे व हारणे सुरू असते. म्हणून निराश होऊ नये. व सर्व विद्यार्थ्यांनी खेळाडूवृत्ती जोपासावी.असे आवाहनही केले.

या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत धरणगांव शहरातील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, लिटल ब्लाझम स्कूल, व अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज धरणगाव या शाळेतील विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला.याप्रसंगी क्रीडा समन्वयक सचिन सूर्यवंशी सर, जितेंद्र ओस्तवाल सर, पवन बारी सर, उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन परवेज शेख सर तर आभार प्रदर्शन अकील खान सर यांनी केले. तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धा यशस्वीतेसाठी तालुका क्रीडा समन्वय समितीने परिश्रम घेतले.