भगवतीदेवी विद्यालयात चालता बोलता कार्यक्रम साजरा

31

✒️सिद्धार्थ दिवेकर(उमरखेड प्रतिनिधी)

उमरखेड(दि.19नोव्हेंबर):-भगवती विद्यालय, देवसरीच्या भव्य निसर्गमय प्रांगणात राष्ट्रगीत प्रार्थना प्रतिज्ञा संविधान व कवायत झाल्याबरोबर चालता बोलता कार्यक्रमाचे चौथ्या पुष्पाला सुरुवात झाली. अतिशय बहारदार कार्यक्रम झाला. यावेळेस बक्षीस देणारे दाते अनिल धर्माजी अल्लडवारसर यांनी पिण्याच्या पाण्याच्या तीन बाटल्या देण्यात आला. बक्षिसाचे मानकरी विद्यालयातील कु. निकिता विश्वंभरव कदम वर्ग 10वा कु. कामिनी मारोतराव कवडे वर्ग 9वा ओंकार गंगाधर माने 5वा या विद्यार्थ्यांना बक्षीस मिळाले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवीन ऊर्जा तयार होत आहे.

विशेष म्हणजे कामिनी मारोतराव कवडे हिला सतत तिसऱ्यांदा बक्षीसास पात्र ठरली आहे व पुढच्या शनिवार कधी येतो याची सर्व मुले आतुरतेने वाट पाहत आहे. या कार्यक्रमास विद्यार्थी शिक्षकवर्ग मुख्याध्यापक प्रल्हादराव मिरासे दिनेश वान्नरे दिगंबर माने शेख सत्तार राजेश सुरवसे सौ.मिनाताई कदम मारुती पुरी अरविंद चेपुरवार यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे संचालन अनिल अल्लडवार यांनी बोलक्या शब्दात केले व पुढच्या कार्यक्रमाचे दाते राजेशभाऊ सुरोसे आहेत असे त्यांनी स्वतःहून जाहीर केले.