✒️प्रतिनिधी खर्डी(अमोल कुलकर्णी)
खर्डी(दि.19नोव्हेंबर):-जिल्हा ग्रामीण तीर्थक्षेत्र असणारे खर्डी येथील श्री सीताराम महाराज यांची पुण्यतिथी कार्तिक वद्य त्रयोदशीला म्हणजे 22 नोंहेबर रोजी आहे.बुधवारी 23 रोजी अमावस्या आणि 24 रोजी गुरुवार असल्याने उत्सव तीन दिवस चालणार आहे.त्यानिमित्ताने दिनांक 16 पासून नामसप्ताहाचे आयोजन ग्रामस्थ व भाविकांनी केले आहे.वार्षिक उत्सव असल्याने सर्वत्र खेळणी, पाळणे दुकाने गावात थाटली गेली आहेत.दररोज नित्यपूजा व कीर्तन प्रवचन भजन आदी कार्यक्रम होत आहेत.
समाधी मंदिर दर्शनासाठी खुले आहे.येथील मंदिरात दर गुरुवारी व अमावस्येला हजारो भाविक येत असतात.तसेच वार्षिक पुण्यतिथी भंडाऱ्यासाठीही लाखो भाविक एकत्र येतात. दिवसातून दोन वेळा पूजा,आरती,नैवेद्य,हरिपाठ असा नित्यक्रम असतो.आताही मंदिरात पूर्णपणे दर्शन रांग नियमावली पाळून दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे.
यासाठी समाधी मंदिर ट्रस्ट योग्य व्यवस्थापन करीत आहे.यावेळी मुख्य विश्वस्त हरीभाऊ कुलकर्णी सचिव गंगाधर केसकर,सदस्य विकास कुलकर्णी, उमेश परिचारक,अध्यक्ष दीपक रोंगे,बापू केसकर हणमंत केसकर,हनुमान मंदिर पुजारी किरण मोकाशी आदीसह सेवेकरी भाविक उपस्थित होते.येणाऱ्या भाविकांसाठी पार्किंग,स्वच्छता यासाठी सरपंच मनीषा सव्वाशे,उपसरपंच शरद रोंगे ग्रामविकास अधिकारी बी व्ही कुलकर्णी, बंडूलाल पठाण,अण्णा कावरे,प्रभू गायकवाड आदी परिश्रम घेत आहेत.