दलित पॅंथरच्या शाखेचे सुखदेव सोनवणे यांच्या शुभहस्ते उदघाटन

34

✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

पुणे(दि.20नोव्हेंबर):- दलित पँथर संघटनेच्या शाखेचे अनावरण धानोरी येथे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.सुखदेव तात्या सोनवणे ह्यांच्या शुभ हस्ते धानोरी शाखेचे उदघाटन करण्यात आले. शाखेचे नियोजन सुमंगल बांबोळे पुणे शहर कार्याध्यक्ष व विजय तेलोरे यांनी केले त्या वेळी ,पुणे शहर अध्यक्ष श्री.प्रकाश साळवे,महाराष्ट विद्यार्थी आघाडी शुभमदादा सोनवणे ,अध्यक्ष युवक पुणे शहर मा.राजेश गायगवळी, जिल्हा युवक अध्यक्ष विक्रम कांबळे ,जेष्ठ पँथर विठ्ठल केदारी, युवक उपाध्यक्ष बालाजी गालफडे, नवनाथ वाघमारे, अंबादास आवटी, नितीन चौधरी, विलियम खामकर ,प्रा.राजेंद्र सोनवणे,पुणे ग्रामिण जिल्हाअध्यक्ष,संघटक अनिल सकट व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी सुखदेव तात्या सोनवणे म्हणाले की,”दलित पॅंथरची स्थापना संस्थापक अध्यक्ष पदमश्री महाकवी नामदेव ढसाळ यांनी केली.त्यास आता ५० वर्ष होत आहे.या सुवर्ण वर्षानिमित्त हे अन्यायाविरोधी बंडकरणारी पॅंथर परत उभी राहली पाहीजे.त्यासाठी सर्व महाराष्टभर या विचारांचा वनवा पेटण्यासाठी खेडोपाडी ,वाडी वस्तीत शाखेंची स्थापना करण्याचा आमचा प्रयत्न आहे.अन्याय सहन करायचा नाही.अन्याय होऊ दयाचा नाही.अन्याय करणा-याला पॅथरच्या भाषेत प्रतिउत्तर देण्यासाठी अशा आक्रमक संघटनेची आवश्यकता आहे.म्हणुनच आज पुणे शहरात धानोरी येथे आज शाखेचे उदघाटन होत आहे.अन्याय तेथे प्रतिकार ही आमची भूमिका आहे.”सर्व पँथर्स यावेळी उपस्थित होते.आभार परदर्शन सुमंगल बांबोळे यांनी मानले.