जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुसई खुर्द येथे बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न

58

🔹विद्यार्थ्यांनी घेतले गणितीय व्यवहाराचे धडे

✒️पी.डी. पाटील सर(धरणगाव प्रतिनिधी)

धरणगाव(दि.20नोव्हेंबर):-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुसई खुर्द येथे सहशालेय उपक्रमांतर्गत बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न झाला. मेळाव्याचे उद्घाटन सरपंच सपना मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी शाळेतील इयत्ता दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी विविध खमंग पदार्थांचे एकूण 20 स्टॉल लावले होते. याचा आस्वाद घेण्यासाठी गावातील ग्रामस्थांनी उपस्थिती दिली.

’भारत जोड़ो’ यात्रा : जाना किधर है? मंजिल कहाँ है??

याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री रविंद्र पाटील,सदस्य प्रदीप गुंजाळ, कल्पना मराठे ग्रामपंचायत सदस्य सुरेश गुंजाळ, राहुल राजकर सिताराम आप्पा व ग्रामस्थ उपस्थित होते मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी उपशिक्षक संजय गायकवाड शाळेच्या मुख्याध्यापिका रजनी सूरमारे व वैशाली वाणी यांनी परिश्रम घेतले.