कुंटूर येथे टिपू सुलतान यांची जयंती उत्साहात साजरी

52

✒️चांदू आंबटवाड(नायगाव ता.प्रतिनिधी)

नायगाव(दि.22नोव्हेंबर) नायगाव तालुक्यातील मौजे कुंटूर येथील सर्व मुस्लीमीयांच्या वतीने टिपू सुलतान यांची 272 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याच जयंतीचे औचित्य साधून मस्जिदीचे ईमाम मौलाना कलीम रझा व मौलाना अहेमद रझा यांनी टिपू सुलतान यांच्या जिवन चरित्रावर प्रकाश टाकला.

तसेच टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त कुंटूर येथील बांधकाम व्यावसायिक तथा काँग्रेसचे कार्यकर्ते शेख रसुल मिस्त्री यांनी उर्दू माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या सर्व विध्यार्थी व विद्यार्थीनींना फराळांची व्यवस्था करून वही व पेनचे वाटप करण्यात आले.

https://www.purogamiekta.in/2022/11/22/55778/

यावेळी कार्यक्रमाला शेख अहेमद, शेख रफत, अफरोझ चौधरी, शेख जिलानी,शेख रिहान,रसुल चुडीवाले,शेख जहीर,शेख जलाल,शेख नईम,शेख अवेज,शेख अदनान, सय्यद सादीक,सय्यद जावेद, शेख सुफीयान, शेख सुलतान, शेख मीजबा,शेख आसिफ, शेख सोहेब व अन्य मुस्लिम बांधव हजर होते.