मार्डी गावची कन्या कोमल सावंत हिने राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मारली बाजी;राज्य कर निरीक्षक व सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून मिळविला अनुक्रमे चौथा व दुसरा क्रमांक

30

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.24नोव्हेंबर):-माण तालुक्यातील मार्डी गावची कन्या कोमल अंकुश सावंत हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये राज्य कर निरीक्षक व सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून महाराष्ट्रातून अनु.जाती मुली मधून अनुक्रमे चौथा व दुसरा क्रमांक मिळवत यश संपादन केले त्याबद्दल मार्डी ग्रामस्थांच्या वतीने आणि तालुक्यातील विविध संघटनांच्या वतीने तिचे अभिनंदन करण्यात आले.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये उदरनिर्वाह करत कोमल हिचे वडील अंकुश नामदेव सावंत यांनी गवंडी काम करत अत्यंत प्रतिकूल परिस्थिती मध्ये आपल्या मुलांना शिक्षण दिले तिने तिचा संपूर्ण अभ्यास हा घरी राहून कोणत्याही प्रकारच्या क्लासची मदत न घेता स्वतः अभ्यास करून हे यश मिळवले आहे हे खूप कौतुकास्पद आहे. या प्रवासात तिची आई आशा सावंत यांनी दिला कोणत्याही घर कामात न गुंतवता पूर्ण वेळ अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहित केले. तर तिचा लहान भाऊ सुद्धा राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देत असून अधिकारी होण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच दुसरा भाऊ वडिलांसोबत गवंडी काम करत या दोघांना खंबीर पाठिंबा देत आहे या यशामध्ये कुटुंबाचा खूप मोठा वाटा आहे.

कोमलचे शिक्षण पहिली ते दहावी मार्डी गावांमध्येच पूर्ण केले. तर बारावी सायन्स मधून व पदवी बी.एस.सी चे शिक्षण दहिवडी कॉलेज येथून पूर्ण केले. 2018 साली पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने राज्य लोकसेवा आयोगाच्या अभ्यासाला सुरुवात केली 2019 साली पहिल्या प्रयत्नात दोन मार्क्सने अपयश आल्यानंतर खचून न जाता जिद्दीने अभ्यास करून 2020 निकालात परीक्षेत यश मिळवले.मार्डी ग्रामस्थांच्या वतीने ह्या यश संपादन केल्याबद्दल तिची गावांमधून मिरवणूक काढून सत्कार करण्यात आला.

https://www.purogamiekta.in/2022/11/24/55834/

यावेळी डॉ. संदीप पोळ, मनोज पोळ,डॉ भारतीताई पोळ , सोनालीताई पोळ, चेअरमन योगेश पोळ,प्रभाकर पोळ,शिवाजी पोळ,डॉ.उज्वल काळे, सुदाम नारणवर, अशोक पवार नंदकुमार पोळ,सरपंच संगीता दोलतडे, पोलीस पाटील आप्पासो गायकवाड , राजेंद्र पोळ , अभय पोळ यांच्यासह पंचक्रोशीतील व गावातील सर्व आजी माजी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. तालुक्यातील बहुजन चळवळीतील संघटना,सामाजिक संघटना,भारतीय बौद्ध महासभा शाखा माण तालुका अशा अनेक संघटनांनी तिला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

अब तेरा क्या होगा रे बुलडोजर!

स्वयंघोषित साईबाबांचे अवतार!