पुसेगावात सलग २१ दिवस श्रवणीय पर्वणी शोभायात्रेने प्रारंभ : विविध ठिकाणचे साधू- महंत यांची उपस्थिती राहणार

45

✒️सातारा खटाव प्रतिनिधी(नितीन राजे)

खटाव(दि.24नोव्हेंबर):-पुसेगावत. तालुका खटाव जिल्हा सातारा येथील विविध राज्यांतील लाखो श्रद्धास्थान • पुसेगाव, ता. खटाव येथील श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीस यावर्षी ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. अमृतमहोत्सव वर्षानिमित्ताने दि. २४ नोव्हेंबर ते शुक्रवार, दि. १६ डिसेंबर या आहे. • कालावधीत सलग २१ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. या सोहळ्याचा प्रारंभ कोल्हापूर करवीर पीठाचे शंकराचार्य स्वामी विद्यानृसिंह भारती व विविध ठिकाणच्या साधू- महंत यांच्या उपस्थितीत शोभायात्रेने होणार असल्याची माहिती देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज व देवस्थान ट्रस्टचे चेअरमन संतोष जाधव यांनी दिली.

यावेळी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त गौरव जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, सचिव अविनाश देशमुख, विशाल माने उपस्थित होते.

पुसेगाव, ता. खटाव येथील मंदिरात गुरुवार, दि. २४ ते बुधवार, दि. ३० या कालावधीत हभप सुरेश सूळ यांच्या मार्गदर्शनाखाली परळी वैजनाथचे हभप तुकाराम मुंढे यांचा दुपारी तीन ते सहा या वेळेत श्रीराम कथा सप्ताह, दि. १ डिसेंबर ते दि. ७ या कालावधीत हभप ज्ञानेश्वर कदम, आळंदी यांचे भागवत कथा, तर दि. ८ ते दि. १२ या कालावधीत श्री गुरुचरित्र पारायण व श्री सेवागिरी विजयामृत ग्रंथाचे पारायण होणार आहे. तसेच याच कालावधीत सायंकाळी ७ ते ९ या वेळेत कीर्तन सोहळा होणार यात हभप शेलार (आंबेघर) प्रवीण हभप बापूसाहेब देहूकर (मळोली), हभप ज्ञानेश्वर कदम (आळंदी), हभप पोपट पाटील (कासार खेड), हभप विशाल खोले (मुक्ताईनगर), हभप पुरुषोत्तम बावसकर (जळगाव जामोद), गोरक्षक हभप संजय पाचपोर (अकोला), हभप केशव नामदास (पंढरपूर), हभप रामकृष्ण लहवीतकर (नाशिक), हभप ज्ञानेश्वर कदम (पाथर्डी), हभप गोपाळ वासकर (पंढरपूर), हभप लक्ष्मण कोकाटे (कण्हेरी), प्रमोद जगताप (बारामती), हभप बाजीराव रणसिंग (रणसिंगवाडी), हभप अॅड. जयवंत बोधले (पंढरपूर), हभप मुकुंद जाटदेवळेकर (पाथर्डी), हभप उमेश दशरथे (आळंदी), ज्ञानसिंधु हभप

संदीपान शिंदे (आळंदी), हभप अनिल पाटील (बार्शी) यांची कीर्तने होणार आहेत तर हभप युवकमित्र बंडातात्या कराडकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता होणार आहे, या कार्यक्रमाला ज्ञानाई गुरुकुल विद्यार्थी वृंद (अकलूज), विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था (आंबेघर) व पुसेगाव पंचक्रोशीतील भजनी मंडळांचे सहकार्य लाभणार आहे. दरम्यान, कीर्तनानंतर देवस्थान ट्रस्टच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले, आहे.

अब तेरा क्या होगा रे बुलडोजर!

दरम्यान, मंगळवार, दि. १३ डिसेंबर ते दि १५ या कालावधीत श्री सेवागिरी महाराज भजन स्पर्धा होणार असून, शुक्रवार, दि. १६ रोजी जप यज्ञाची सांगता होणार आहे. त्या नंतर महाराजांचा वार्षिक रथोत्सवानिमित्ताने होणाऱ्या झेंडा मिरवणूक, क्रिकेट, व्हॉलीबॉल, मॅरेथॉन स्पर्धा, बैलगाडी शर्यती, कुस्त्यांचा आखाडा, रथोत्सव, कृषी प्रदर्शन, युवा महोत्सव, श्वान शर्यती, कब्बडी स्पर्धा, खिलार जनावरांचे प्रदर्शन या कार्यक्रमांना सुरुवात होणार असल्याची माहिती विश्वस्त गौरव जाधव, संतोष वाघु सचिन देशमुख, डॉ. सुरेश जाधव व रणधीर जाधव यांनी दिली.

गोवरचा विळखा वाढतोय….