आयुष्यमान भारत नावनोंदणी शिबीर संपन्न

62

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.24नोव्हेंबर):-देशातील गरजू व्यक्तींना चांगले व मोफत वैद्यकीय उपचार मिळावेत म्हणून केंद्र सरकारने सुरु केलेल्या आयुष्यमान भारत योजनेचा लाभ सर्वसामान्य लोकांना व्हावा यासाठी गंगाखेड विधानसभेचे कार्यसम्राट आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शासकीय योजना मोफत मदत केंद्राच्या वतीने शहरातील संत जनाबाई मंदिरात नावनोंदणी व कार्ड वितरण शिबीर घेण्यात आले.

सामाजिक बांधिलकीतून आयोजित केलेल्या या शिबीराचे उद्घाटन सुभाष शेठ नळदकर यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष राधाक शन शिंदे, राजेश दामा उद्धव शिंदे, माणिक आळसे उपस्थित होते.गरजू व गरीब रुग्णांना आधुनिक व चांगली वैद्यकीय सेवा मिळण्याच्या हेतूने सुरु झालेल्या आयुष्यमान भारत योजनेची नावनोंदणी करुन कार्ड भेटलेल्या व्यक्तींना योजनेचा थेट लाभ घेता येतो. त्यानुसार ५ लाख रुपये पर्यत मोफत उपचार होतो. त्यासाठी उत्पन्नाची अट ठेवली असून नावनोंदणी करुन कार्ड मिळविणे बंधनकारक करण्यात आले आहे.

अब तेरा क्या होगा रे बुलडोजर!

सिव्हिल हॉस्पिटल, डॉ.प्रफुल्ल पाटील मल्टि स्पेशालिटी सेंटर डेंन्टल महाविद्यालय, स्पर्श हॉस्पिटल, स्वाती क्रिटीकेअर, स्पंदन हॉस्पिटल या ठिकाणी आयुष्यमान भारत योजने अंतर्गत मोफत उपचार केले जातात.

गोवरचा विळखा वाढतोय….

दरम्यान, आयुष्यमान भारत हि लोकपयोगी योजना असून त्याचा लाभ देशातील कोट्यवधी रुग्णांनी घेतला आहे. त्यामुळे गंगाखेड मतदार संघातील लोकांना योजनेची माहिती व्हावी. तसेच त्यांची वेळेत नावनोंदणी करुन कार्ड वितरीत करावेत, यासाठी शासकीय योजना मोफत मदत केंद्राच्या वतीने काही ठिकाणे शिबीरे घेण्यात येणार आहेत. तसेच गरजू लोकांनी गंगाखेड शहरातील राम-सीता सदन येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून नावनोंदणीसह कार्ड मिळवावे, असे आवाहन कार्यसम्राट आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी केले आहे.