भारतीय संविधानाने स्त्रीयांना समानतेचा अधिकार व सर्वांना सम्मान बहाल केला – प्रो.डॉ.एम.डी.इंगोले

32

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.27नोव्हेंबर):-शासकीय अल्पसंख्यांक मुलींच्या वस्तीगृहा मध्ये भारतीय संविधान दिन कार्यक्रमाचे आयोजन दि.२६ नोव्हेंबर. रोजी करण्यात आली असून गंगाखेड कार्यक्रमाच्या सुरुवातीला विश्वरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रजिल्यात करण्यात आले. तसेच भारतीय संविधान ग्रंथाला सुद्धा पुष्प वाहून अभिवादन केले. कार्यक्रम सुरुवातीला संविधान उद्देशिकेचे वाचन करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.

या प्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन वस्तीगृहातील अधीक्षीका सौ. सीमाताई हारबडे मॅडम होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. एम. डी. इंगोले सर यांनी या प्रसंगी “संविधानाने स्त्रियांना मान-सन्मान व समानतेचा अधिकार प्रदान केला”.भारतीय समाजातील स्त्रीयांचे स्थान काय होते या विषयी विचार मांडले. डि.जी. वाळवंटे , प्रा. राठोड सर यांनी उपस्थित मुलींना संविधान विषयी व तसेच या स्पर्धेच्या युगातील स्पर्धा परीक्षा कशा पद्धतीने द्याव्यात त्यामध्ये अभ्यासाची रूपरेषा कशी असावी नियोजन कसे असावे याविषयी प्रकाश टाकला.

या कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षीय विचार वस्तीग्रहाचे अधीक्षीका व कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. सीमाताई हारबडे मॅडम यांनी मांडले या कार्यक्रमासाठी मा.लक्ष्मण निरस ,मा.सिद्धार्थ कांबळे,व तसेच बोद्धाचार्य,लक्ष्मण व्हावळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.भारतीताई जाधव यांनी केले. आभार कु. यशस्वीतेसाठी विद्याताई केदारे ,आवचार मॅडम पल्लवीताई परतवाघ, प्रज्ञा मॅडम ,वाघमारे मॅडम, पल्लवीताई केदारे ,शोभाताई साळवे आणि वस्तीगृहा तील सर्व मुलींनी परीश्रम घेतले. सेवटी २६ / ११ हल्यातील शहीदांना दोन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .