राजेंद्र विद्यालय भोयगांव येथे संविधान दिवस साजरा

54

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

भोयगांव(दि. 28नोव्हेंबर):- संभाजी बहुउद्देशीय शिक्षण संस्था राजुरा द्वारा संचालित

राजेंद्र विद्यालय भोयगांव येथे संविधान दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. व्ही. एस. चटप तर प्रमुख पाहुणे श्री. बी. झेड. निखाडे, श्री. एम. ए. अरके, श्री. डी. डी. ठाकरे, श्री. जी. एम. लांडे, कु. व्ही. टी. वैद्य, कु. एस. एन. गाडगे, श्री. डी. आर. चीने, श्री. व्ही. बी. वनकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार व पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

प्रास्ताविकपर मार्गदर्शन कु. व्ही. टी. वैद्य यांनी केले. संविधानाच्या प्रास्तविकेचे वाचन कु. वैष्णवी राजेंद्र वरारकर, कु. श्रुतिका पारखी कू. वैष्णवी शंकर लोंढे कु. मानसी राजेंद्र वरारकर या विद्यार्थिनिने केले. याप्रसंगी श्री. जी.एम. लांडे सर यांनी संविधानाची वाटचाल व महत्त्व यात बाबासाहेबांची भूमिका यावर विस्तृत व महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. चटप सर यांनी घटनेचे शिल्पकार होण्यासाठीची बाबासाहेबांची विद्वत्ता विद्यार्थ्यांनी प्राप्त करावी. असे मनोगत व्यक्त केले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. व्ही. टी. वैद्य तर आभार कु. एस. एन. गाडगे यांनी मानले.

https://www.purogamiekta.in/2022/11/29/56114/