दलित मित्र व आदिवासी सेवकांना दहा हजार रुपये मानधन द्या- डी. के. आरीकर मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांना निवेदन

27

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.2डिसेंबर):-समाजातील दलित, शोषित, पीडित, उपेक्षित, वंचित व आदिवासी अशा नागरिकांच्या विकासासाठी ज्याने आपले आयुष्य खर्ची घातले अशा व्यक्तींना दरवर्षी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर समजभूषण ( दलित मित्र ) व आदिवासी समाजाच्या विकासासाठी काम करणाऱ्या व्यक्तींना आदिवासी सेवक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. स्वातंत्र्य लढ्यात ज्या व्यक्तींनी बंड पुकारले व इंग्रजांना सळो की पळो करून सोडले अशा व्यक्तींना तुरुंगाताही जावे लागले तशा व्यक्तींचा स्वातंत्र्य संग्राम सेनानी म्हणून गौरव करून केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या सोई सवलती उपलब्ध करून दिल्या व प्रतिमाह मानधन सुद्धा देण्याची सोय केली व आजही सुरु आहे.

त्याच धर्तीवार सामाजिक काम करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण ( दलित मित्र ) व आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त व्यक्तींना दहा हजार रुपये मानधन देऊन केंद्र शासन व महाराष्ट्र शासनच्या सोई सवलती लागू कराव्या अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. एकनाथरावजी शिंदे यांना एका निवेदणाद्वारे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण चंद्रपूर यांच्या मार्फत केली आहे.

असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र संघ नागपूरचे कार्याध्यक्ष दलित मित्र व आदिवासी सेवक डी. के. आरीकर यांनी केली आहे. त्याच प्रमाणे रेल्वे प्रवासात एसी 2 टायर व 3 टायर मध्ये 1+1 शंभर टक्के शूट देण्यात यावी. एसटी च्या शिवशाही, शिवनेरी सहित इतरही सवलत देऊन 2 सिटचे आरक्षण देण्यात यावे अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात डी. के. आरीकर, व्ही. डी. मेश्राम, विजय मोगरे, सांबा वाघमारे, प्रा. इसादास भडके, किसन झाडे,ए. एम. खैरे, जांभुळकर, राजू येले यांची उपस्थिती होती.

https://www.purogamiekta.in/2022/12/01/56264/