यवतमाळ येथे लाँचिग कार्यक्रम व कार्यशाळा संपन्न

34

🔹एमपीजे च्या बंधुता अभियानां सुरवात

✒️यवतमाळ(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

यवतमाळ(दि. 2 डिसेंबर):- मोमेंट फॉर पीस अँड वेल्फेअर फॉर वेलफेअर या सामाजिक संघटनेतर्फे दहा डिसेंबर पर्यंत राबविण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय बंधुता अभियानाचा लॉंचिंग कार्यक्रम व कार्यशाळा एम.बी. खान कनिष्ठ महाविद्यालय येथे संपन्न झाला.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रा .घनश्याम धरणे, विलास काळे, अँड.जयसिंग चव्हाण, एड .शबाना सय्यद,प्रदेश सचिव हुसेन खान, फिरोज अंसारी आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी अँड. शबाना सैय्यद म्हणाल्या की बंधूता तत्व कठीण तरीही महत्त्वाचा आहे .बंधुता म्हणजे समस्त भारतीयांसाठी एक सामायिक असा भातृभाव जर का भारतीय समाज हा स्वतःला एक संघ समाज मानत असेल तर हेच तत्व सामाजिक आयुष्यात एकता आणते. बंधुताच्या अभावी समता आणि स्वातंत्र मिळवणं हे केवळ वरवरचा देखावा आहे.

जनसामान्यांमध्ये आत्मिक व मानसिक एकतेची प्रबळ भावना म्हणजे बंधुता विलास काळे आपले मनोगत व्यक्त करत म्हणाले की आत्मा ही संकल्पना भारतीय संविधाना ला लागू पडत नाही . परंतु पारंपरिक पद्धतीमुळे बोलल्या जाते. भारतीय संविधान लोकशाहीचा जागर आहे.

लांकशाहीचा आधार आहे लोक शाही चा सर्वेसर्वा आहे असे मत ओबिसी नेते विलास काळे यांनी मांडले
त न्यायालय देह व्यवसायासाठी परवानगी देते पण हिजाब वर बंदी घालते याची खंत काळे व्यक्त केली.

आपल्या अभ्यास पूर्ण भाषणात प्रा. घनशाम दरणे म्हणाले की काळानुसार बऱ्याच गोष्टीत बदल होतो अनेकदा घटनादुरुस्त्या झाल्या परंतु कुठल्याही पातळीवर मानवी हक्क न बदलताना येणारे अपरिवर्तनीय आहेत.

दरणे पुढे म्हणाले की,एका भारतीय व्यक्तीला दुसऱ्या राज्यात घरामध्ये, समूहामध्ये जाताना त्यांच्या वेशभूषेमुळे त्यांच्या एकत्रित असल्यामुळे एक दुसऱ्याच्या मनात असुरक्षितत वाटण हे आपल्या देशा ची तबीयत बिघडल्याचे लक्षण आहे
याचा अर्थ देशात काहीतरी बदलत आहे त्या मागे जे अंडर करंट आहेत त्याचा शोध घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले
या प्रसंग अँड. जयसिंग चव्हाण म्हणाले की स्वातंत्र्या पूर्वी आपला भाग मध्य प्रांतात येत होता.

या मध्य प्रातांतून आपल्या यवतमाळ चे सै .काझी करीमोद्दीन संविधान सभे मध्ये निवडून गेले होते . त्यांनी संविधान सभेच्या चर्चे मध्ये गोपनियते चा हक्क वैयक्तीक असायला पाहीजे अशी मांडणी केली होती त्यावेळी ती मागणी नामंजुर करण्यात आली.

परंतु पुढे 70 वर्षा नंतर 2019 मध्ये गोपनियतेच्या हक्काला मुलभुत अधिकार म्हणून दिल्या गेले . हे आपल्या साठी अभिमानाची बाब असल्याचे मत अँड जयसिंग चव्हाण यांनी व्यक्त केले .

न्याय, समानता, बंधुता, स्वातंत्र्य या चार बाबी तेव्हाच पूर्ण होऊ शकतात जेव्हा बंधुता राहील .स्वातंत्र आहे न्याय नाही तर काही लोकांच्या हातात स्वातंत्र जाईल स्वातंत्र आहे न्याय आहे समानता नाही तर विषमता निर्माण होईल.

न्याय , समानता, स्वातंत्र्य या तिन्ही गोष्टी प्राप्त होण्या सानो देशात बंधुता प्रस्तापित होणे गरजेचे असल्याचे ही चव्हाण म्हणाले .
या कार्यशाळेत विदर्भातील एम पी जें चे कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.

…तेही आपलेच भाऊबंद आहेत की हो!

कार्यक्रमाचे प्रास्ताविक हुसेन खान यांनी सूत्रसंचालन राशीद अनवर यांनी तर आभार प्रदर्शन आयाज खान यांनी केले.