लोकशाहीचा चौथा स्तंभ धोक्यात

34

देशातील,राज्यातील प्रामाणिक कार्य करणारे पत्रकार जे देशाचे, समाजाचे येथील व्यवस्थेचे, अन्याय, अत्याचार विषयी वास्तव माहिती देतात मांडतात त्यांच्यावर हमले होतात, त्यांना खोट्या केसेस मधे अडकवण्यात येते. उदा. महत्वाचे पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या, तसेच पत्रकार सिद्दिक कप्पन हे हाथरस जाण्याअगोदरच त्यांच्या वर खोटे गुन्हे लावून त्यांना जेल मध्ये टाकण्यात येते आताही ते जेल मधेच आहेत. तसेच या व्यवस्थेची वास्तव माहिती देणारे न्यूज क्लिक या YouTube चॅनल ऑफिस वर ED ने 114 तास कारवाही करण्यात येते तसेच तेथील पत्रकारांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो.

सद्याचे प्रकरण घेतल्यास एनडीटीव्ही टीव्ही चे पत्रकार रवीश कुमार यांनी नुकताच राजीनामा दिला. त्यामागचे वास्तव काय असेल हे समजून घेणे गरजेचे आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ आज धोक्यात आहे वास्तव माहिती देणारे पत्रकार, वृत्तपत्र, YouTube चॅनल वाले यांना जर त्रास दिल्या जात असेल त्यांच्यावर हमले होत असेल,त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल होत असेल, त्यांच्या हत्या होत असतील तर या व्यवस्थेत चालणाऱ्या वाईट गोष्टी,अन्याय,अत्याचार, फसवणूक , प्रशासन,शासन या विषयी वास्तव माहिती कोण देणार ?

चौथा स्तंभ कमजोर व्हावा व या व्यवस्थेचं वास्तव कोणाला माहीत होऊ नये हा कुणाचा डाव आहे ? प्रामाणिक पत्रकारांची आज गरज आहे जर मनुवादी ,वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी कितीही प्रामाणिक पत्रकारांना थांबवण्याचा ,फसवण्याचा, खोट्या केसेस मधे अडकवण्याचा प्रयत्न केला तर खबरदार आम्ही हे खपवून घेणार नाही. या अगोदर पत्रकारांवरील होणारे हल्ले, खोटे गुन्हे,हत्या थांबाव्या म्हणून आदिवासी गोवारी विद्यार्थी संघटनेच्या वतीने माझ्या मार्गदर्शनाखाली आंदोलन केले. लोकशाहीचा चौथा स्तंभ आम्ही पत्रकार थांबणारे नाहीत अजून जोमाने या व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न करू व मनुवादी लोकांचा डाव हाणून पाडू .

✒️पत्रकार भूषण सरदार(अमरावती)मो:-9420621994