श्रीमद अखंड भागवत हरिनाम सप्ताह प्रारंभ

30

✒️सिद्धार्थ दिवेकर(उमरखेड प्रतिनिधी)

उमरखेड(दि.4डिसेंबर):-दि. 02/ 12 /2022 रोज शुक्रवारला श्रीमद् भागवत अखंड हरिनाम सप्ताह काळा मारुती मंदिराजवळ भगतसिंग वार्ड उमरखेड येथे सुरुवात झाली. आहे. यात ज्ञानेश्वरी पारायण ह.भ.प. पुष्पाताई उमरखेड यांचे तर भागवताचार्य ह.भ. प. बाबुराव महाराज तेरकर (व्यसनमुक्ती व गोपाल प्रचारक) यांच्या वाणीतून होणार आहे. सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम सकाळी पाच ते सहा काकडा भजन सकाळी सात ते दहा ज्ञानेश्वरी पारायण दुपारी एक ते चार श्रीमद् भागवतकथा सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ व रात्री आठ ते दहा हरिकीर्तन होणार.

दि.02 /12/2022 पंढरीनाथ महाराज यांचे कीर्तन 03 /12 /22 मोहन महाराज शिऊर 04/12/2022 शिवाजी महाराज पिंपळगाव 05/12/2022 ऋषिकेश महाराजश शे. पिंपरी 06/12/2022 नरसिंह महाराज केरळी 07/12/2022 गजानन महाराज सायखेड यांचे दत्त जयंती निमित्त दुपारी12वा. किर्तन होणार08/12/2022 मारोतराव महाराज हातला दुपारी चार ते सहा नगर प्रदक्षिणा होईल. 09/12/2022दुपारी बारा ते दीड पर्यंत भागवताचार्य बाबुराव महाराज तेरकर यांचे काल्याचे किर्तन होईल व नंतर महाप्रसादाचा वाटप त्याचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आव्हान भगतसिंग वार्डातील जनतेने केले आहे. याची सर्व उमरखेड नगरवासीयांनी नोंद घ्यावी.