वेणूताई चव्हाण कॉलेजमध्ये एड्स दिन उत्साहात साजरा

27

✒️कराड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कराड(दि.7डिसेंबर):- आजच्या सामाजिक जीवनामध्ये एड्स बद्दल जनजागृती करणे गरजेचे आहे. आजची सामाजिक परिस्थिती, मोबाईलचा वाढता वापर या काळात तरुणांनी सजग राहणे गरजेचे आहे. यासाठी 1डिसेंबर ते 7 डिसेंबर हा एड्स जनजागृती सप्ताह साजरा केला जातो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून एड्स बद्दल जनजागृती केली जाते. सध्याच्या मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे मुलांना अनावश्यक माहिती सुद्धा उपलब्ध होत आहे या परिस्थितीत मुलांनी सजग राहिले पाहिजे.

मोबाईल वरील अधिकृत माहिती पाहिली पाहिजे. व या वयात अभ्यास व करिअरचा विचार केला पाहिजे असे प्रतिपादन कराड उपजिल्हा रुग्णालयाचे समुपदेशक मा.श्री. महेश शिंदे यांनी केले.राष्ट्रीय सेवा योजना व स्वर्गीय वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड. यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिनानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी एच. आय. व्ही. व एड्स या संदर्भातील सविस्तर माहिती दिली. यामध्ये एच.आय.व्ही. ची सुरुवात कोठून झाली,तो भारतात 1982 च्या दरम्यान कसा आला. एड्स म्हणजे काय? एचआयव्ही म्हणजे काय ? त्याबद्दलचे समज गैरसमज, कारणे,प्रसार, प्रतिबंध व उपचार या सर्वांबद्दल योग्य मार्गदर्शन केले. कॉलेजचे उपप्राचार्य मा.श्री. आर.ए.कांबळे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली.

सध्या भारतातील लोक आरोग्य व औषधांच्या बाबतीत किती अज्ञानी आहेत हे सांगितले यासाठी विद्यार्थ्यांनी साध्या साध्या गोष्टींना बळी न पडता स्वतःच्या मनाला लगाम घालून स्वतःचा विकास करावा. शाळा कॉलेज येथे जीवनाचे मार्गदर्शन मिळते त्याचा लाभ घ्यावा. योग्य करिअर करावे याबद्दल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय श्री.के.एस महाले यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. पी.एस. सादीगले यांनी केले श्री. यु.एस.मस्कर यांनी कार्यक्रमाचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. श्री अमोल जाधव, प्राध्यापक,प्राध्यापिका विद्यार्थी,विद्यार्थिनी व सेवक बहुसंख्येने उपस्थित होते.