उपजिल्हा रुग्णालय गेवराई येथे आयुष कार्यक्रमाअंतर्गत होमिओपॅथी कक्षाचा लोकार्पण सोहळा संपन्न

32

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.9डिसेंबर):-येथील उपजिल्हा रुग्णालयात अनेक वर्षांपासून होमिओपॅथी विभाग कार्यान्वित नव्हता.त्यामुळे रुग्णांना होमिओपॅथी सुविधा मिळत नव्हती.या पार्श्वभूमीवर गेवराई येथील प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ डॉ अनिल आर दाभाडे यांची मागील महिन्यात मानद डॉक्टर म्हणून उपजिल्हा रुग्णालय येथे नेमणूक झाली.आज दिनांक 09/12/2022 रोजी स्वतंत्र होमिओपॅथी कक्षाचे लोकार्पण वैद्यकीय अधीक्षक डॉ राजेश शिंदे यांच्या हस्ते पार पडले.

ही सेवा पूर्णपणे मोफत असून दर शुक्रवारी व शनिवारी सकाळी 8:30 ते दुपारी 12:30 पर्यंत उपलब्ध राहील.तरी तालुक्यातील रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ राजेश शिंदे यांनी केले आहे.तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ महादेव चिंचोले सर व विद्यमान वैद्यकीय अधीक्षक डॉ राजेश शिंदे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे सदरील कक्ष उभारण्यात आला आहे.‌ उपजिल्हा रुग्णालयात प्रथमच या सेवेची सुरुवात होत असून याबद्दल सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे.

यावेळी ॲड कमलाकर देशमुख, ॲड केशव ठोसर, ॲड भगवान घुंबार्डे,डॉ सर्वोत्तम शिंदे,डॉ सराफ,डॉ भगवान जाधव,डॉ मडकर,डॉ भुतडा,डॉ चंदनशिव,डॉ हिंगे,डॉ मिसाळ,डॉ पारखे,डॉ रांदड,डॉ बांगर, मुरलीभाऊ घोडके,दिलीप माने,केशव पंडित, संपत दाभाडे,पत्रकार सोमनाथ मोटे,काझी अमान,अमोल वैद्य,सौ सिता महासाहेब,हुंबरे बापू,चंद्रकांत गोरे,नंदकिशोर सातपुते,श्रीनिवास भोसले,शेख हुसेन मिया, शफीभाई शेख, अलीम शेख,सखाराम कानगुडे,संभाजी भोसले,केशव सौंदलकर, कॉ प्रल्हाद आहेर,लोखंडे साहेब,मच्छिंद्र गायकवाड,रमेश लाड,रघुनाथराव वाघमारे,रोहन दाभाडे,करण दाभाडे यांच्या सह समाजातील अनेक मान्यवर तसेच रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.