स्व.भोलारामजी कांकरिया यांच्या 46 व्या स्मृति दिना निम्मित 46 रक्त दात्याचे रक्तदान

40

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(11डिसेंब):-विवार रोजी गंगाखेड शहरांमध्ये स्व.भोलाराम जी कांकरिया यांच्या 46 व्या स्मृतिप्रित्यर्थ भोलारामजी कांकरिया बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट तर्फ गंगाखेड येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.गंगाखेड़ चे उपविभागीय अधिकारी श्री सुधीरजी पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

बीकेबीसी ट्रस्टच्या सचिव सौ मंजूताई दरडा तसेच प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शिवसेनाप्रमुख विशालजी कदम,रिपाई चे प्रमुख डॉक्टर सिद्धार्थजी भालेराव, महेश बँक परभणी चे अध्यक्ष घनश्यामजी मालपाणी,साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंद यादव, संतोषजी तापडिया ,सवंगडी कट्टा मनोज न्हावेकर,रमेश औसेकर,गोकुळ गुपचे प्रमुख श्रीधरराव मुरकुटे,हिंदवी स्वराज हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे प्रमुख रामेश्वर भोसले,राजस्थानी सेवा संघाचे अध्यक्ष नंदकिशोर जी सोमानी, तालुका शिक्षक सरचिटणीस बाळासाहेब राखे, रजत गायकवाड पाटील, शिवसेना शहर प्रमुख जितेश गोरे,सुभाषचंद गेलड़ा दीपकभैय्या बचाटे,प्रा.डॉ.चोरघडे, ॲड नंदकुमार काकांनी आदी मान्यवर उपस्थित होते.

बीकेबीसी ट्रस्टच्या सचिव सौ मंजुताई दर्डा यांच्या मार्गदर्शनाखाली हा शिबिर अतिशय उत्स्फूर्त रक्तदात्यांच्या प्रतिसादाने संपन्न झाला. या रक्तदान शिबिरा मध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. दहापेक्षा जास्त महिलांनी रक्तदान केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिद्धार्थ दर्डा, प्रीतम अच्छा ,शुभम अच्छा ,ऋषभ दर्डा,अमर करंडे, सुजाता पेकम, यश , प्रणव गेलड़ा, पूजा दर्डा आदींनी सहकार्य केले.या रक्तदान शिबिरामध्ये एकूण 46 रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले आहे.

चंपा’ची बौद्धीक वेश्यागिरी…!