चंपा’ची बौद्धीक वेश्यागिरी…!

63

राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा सुरू केल्या,अशाप्रकारे वादग्रस्त वक्तव्य भाजपाचे नेते,राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील अर्थात ‘चंपा’ यांनी केले आहे.औरंगाबादेतील पैठण येथील संतपिठाच्या कार्यक्रमात त्यांनी अशाप्रकारे वक्तव्य करत आपल्याला बहुजन महापुरूषांच्या द्वेषाची कावीळ झाल्याचे दाखवून दिले आहे.

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बहुजन महापुरूषांच्या बदनामीचा एककलमी कार्यक्रम आखण्यात आला आहे. त्यात अपमान करणारे सारेच सारे आरएसएसच्या विखारी शाळेत तयार झालेली लोकं आहेत. त्यामुळेच त्यांचा मेंदू ब्राम्हणांकडे गहाण ठेवण्यात आला आहे. आरएसएसच्या तालमीत तयार झालेल्या सडक्या मेंदूतून हीच गटारगंगा वाहणार त्यात नवल ते काही नाही.कारण आरएसएसची एक विकृती आहे.त्या विकृतीतूनच ‘चंपा’ यांनी तसे वक्तव्य केले आहे.बहुजन महापुरूषांचा सतत अपमान करण्याची विकृती फोफावताना दिसत आहे.या विकृतीला ठेचण्यासाठी ज्यांचा मेंदू आजही शाबूत आहे व जे ब्राम्हणांच्या मानसिक गुलामीत जगत नाहीत अशांनी आवाज उठवला पाहिजे.वेळप्रसंगी रस्त्यावरची लढाई लढणे गरजेचे आहे.ज्यांच्याबद्दल ‘चंपा’ यांनी अपशब्द वापरले ते राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील…! आता या ‘चंपा’ला माहित नाही का राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले हे श्रीमंत होते.फुले यांची स्वत:ची कॉन्ट्रॅक्टर कंपनी होती. त्यावेळी टाटापेक्षाही फुले श्रीमंत होते.

एवढा श्रीमंत असलेला माणूस केवळ बहुजनच नव्हे समस्त मानव समाजाच्या उत्थानासाठी काम करतो. त्यांना शिक्षण मिळावे म्हणून शाळा सुरू करतो.शाळा सुरू करून मानवी जीवनमूल्याची जोपासना करतोे.फुले दाम्पत्याने शाळा सुरू केल्या म्हणून अक्षरओळख ‘चंपा’ यांना झाली ना. नाहीतर शिक्षणाचा अधिकार होता का तुम्हांला.त्यावेळी विरोध करणारे ब्राम्हण…ज्यांची हे मानसिक गुलामीची पालखी वाहत आहेत.डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे तर जागतिक किर्तीचे सिम्बॉल ऑफ नॉलेज आहेत.ते स्वत: प्राध्यापक होेते. स्वकष्टाने त्यांनी जागतिक किर्तीचे शिक्षण घेतले आणि कॉलेज व शैक्षणिक संस्था उभारल्या. कर्मवीर भाऊराव पाटील देखील श्रीमंतच होते. हे केवळ श्रीमंत नव्हते तर मनानेदेखील श्रीमंत होते. म्हणूनच त्यांनी बहुनांची पोरं शिकली पाहिजेत यासाठी शिक्षणाची दारे खुली करून दिली. त्यावेळी समजा आर्थिक अडचण आली असेल तर त्यांनी बहुजन समाजाला आवाहन करत शैक्षणिक मदतीचे आवाहन केले असेल.त्यांच्या आवाहनाला बहुजन समाजातील लोकांनी प्रतिसाद देत शाळा उघडण्यास मदत केली असेल.परंतु त्या मदतीला भिकेची उपमा देत ‘चंपा’ यांनी आपण बौद्धीक ‘भिकारी’ असल्याचे अप्रत्यक्ष दाखवून दिले आहे.
बहुजन महापुरूषांबद्दल या लोकांच्या मनात एवढा द्वेष का? तर बहुजन महापुरूषांचा खराखुरा इतिहास लोकांना समजला आणि त्यांनी उद्या भविष्यात ‘कलमकसाई’ असलेल्या ब्राम्हणी व्यवस्थेच्याविरोधात आवाज उठवला तर येथील वर्चस्व समाप्त होईल. ते वर्चस्व समाप्त होऊ नये म्हणून नाना तर्‍हेच्या लबाड्या व क्लृप्त्या त्यांच्याकडून केल्या जातात. अशीच बहुजन महापुरूषांच्या बदनामीची मोहिम राबवणे ही त्यांची लबाडी आहे. लबाडी करणे त्यांच्या डीएनएमध्येच आहे. म्हणून सातत्याने बहुजन महापुरूषांच्या बदनामीचा प्रयत्न केला जातो.

ब्राम्हणाकडे बुद्धी असली तरी त्याने आपल्या बुद्धीचा वापर एखाद्या वेश्येसारखाच केला आहे असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मत होते.म्हणजे आपली बुद्धी समाजहिताची असावी असे त्यांना कधीच वाटले नाही.समाजविघातक कृतीसाठीच त्यांनी बुद्धीचा वापर केला आहे. त्यामुळे आरएसएसच्या विकृत विचारधारेत तयार झालेल्या ‘चंपा’नी अशाप्रकारे बेताल वक्तव्य करून आपल्या बौद्धीक वेश्यागिरीचा नमुना पेश केला आहे. त्यामुळे अशा विकृत लोकांच्या ‘भिकारी’ मानसिकतेचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. शेम…शेम…‘चंपा’…!

✒️दिलीप बाईत(मंडणगड,जिल्हा रत्नागिरी)मो:-९२७०९६२६९८