चला आता एक होऊ या!

33

आज आपण बघितले तर राजकारणाची घसरती नैतिकता, पदाचा गैरवापर, सत्तेचा दुरूपयोग करून येथे शासकीय यंत्रणा सह शासकीय अधिकारी पदाधिकारी दबावाखाली काम करत असल्याचे अनेक वेळा समोर आले आहे. हल्ली जाणीव पुर्वक इतिहास, महापुरुष यांच्या कार्य व विचार यांच्या शी छेडछाडी करत आहेत. चुकीचा इतिहास सांगणे, महापुरुषांचा सन्मान न हे आज पुर्वनियोजीत आहे. एकाचे बोलायचे आणि दुसऱ्याने सांभाळून घ्यायचे आणि त्याला शासकीय सुरक्षा कवच द्यायचे असे प्रकार येथे सुरू आहेत. एका महिन्यापासून महापुरुषांच्या नावाची, कामाची, इतिहासाची बदनामी एकाच पक्षाच्या नेत्यांकडून केली जात होती तेव्हा मात्र कुठेच कोणी बोलत नव्हते उलट तस घडलेच नाही यावर भर देऊन बोलणाऱ्याला पाठीशी घातले जात होते. असे करून यांची हिंमत वाढली आणि चंद्रकांत पाटील यांनी तर सर्वच मर्यादा म्हणून भिक शब्दांचा वापर करून पक्षाने दिलेले संस्कार व बौद्धिक पातळी दाखवून समाजातील लोकांना भडकवण्याचे काम केले. एवढी मोठी चुक होऊन सुद्धा माफी न मागता स्पष्टीकरण देत बसले.

पण आज राजकारण जरी नैतिकता आणि स्वाभिमान हरवून लाचार झाले असेल पण समाज जागृत आणि स्वाभिमानी आहे. महापुरुषांचा अवमान करूनही ते काही झालेच नाही अशा आर्विभावात वागु लागले. तेव्हा एका स्वाभिमानी, जागृत मनोज ने निषेध म्हणून तोंडावर शाईफेक केली. एखाद्या व्यक्तीच्या अंगावर शाई फेकणे, शेण, मुत्र, फेकून त्यांना अवमानीत करणे चुकिचेच आहे. पण जशी शाई चंद्रकांत पाटील यांच्या तोंडावर पडली तेव्हा मात्र सर्वांना जाग आला आणि आक्रमण होऊन बोलायला लागले. चंद्रकांत पाटील यांच्या वर शाईफेकीचा निषेध करून शाईफेक करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याची भाषा करु लागले. चंद्रकांत पाटील यांच्या पक्षाचे लोक एका शाईने जागृत झाले आणि चंद्रकांत पाटील यांचा अवमान च नाही तर जिवे मारण्याचा प्रयत्न, पुर्वनियोजीत कट अशा प्रकारचे कमल लाऊन मनोजवर कारवाई करण्याचा सुर निघाला. पण महापुरुषांचा अवमान झाला ही बाब मात्र ते मान्य करायला तयारच होत नव्हते. पण शाई शाईफेकल्याने जर चंद्रकांत पाटील यांचा अवमान होतो, तो प्राणघातक हल्ला असतो तर महापुरुषां बदल भिक शब्द उच्चारणे काय असते याची प्रचिती त्यांना मनोमन आलेली असेल.

एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. आज यांना महापुरुषांचा अवमान कसाही केला तरी चालतो पण नेत्यांच्या अंगावर शाई फेकलेली चालत नाही. थोडक्यात काय तर हे महापुरुषांच्या नावाने मताची भिक मागतात आणि एकदा निवडून आले की महापुरुषांचा सन्मान देखील करत नाहीत एवढे हे निगरगट्ट झालेले आहेत. यांना वाटतं सत्ता हातात आहे तर आपण सत्तेचा कसाही वापर करून आंदोलन दाबु शकतो, मिडिया विकत घेऊ शकतो, संपादकांना स्क्रीप्ट देऊ शकतो. पण आजही स्वाभिमानी पत्रकार, संपादक, आणि कार्यकर्ते आहेत जे जिवाची काळजी न करता लाचार न होता निर्भिड पणे आपले मत मांडतात. महापुरुषांच्या नावावर निवडून आलेले लोक महापुरुषांचा अवमान करणाऱ्या सोबत आहेत. त्यांना काही घेण देणही नाही. ते निषेध करत नाहीत, ते महापुरुषांचा अवमान झाला म्हणून नैतिकता म्हणून राजिनामा देत नाहीत. राजकीय नेत्यांना आपली खुर्ची जाईल, आपल्याला नंतर तिकीट मिळणार नाही, पक्षभंगाची कारवाई होईल,वरिष्ठ नाराज होतील म्हणून एकही आमदार खासदार हा सत्तेत असून महापुरुषांचा अवमान झाला की जनतेच्या बाजुने न बोलता गप्प राहतो. ही राजकीय लाचारी दिवसेंदिवस वाढत आहे. राजकीय लाचारी वाढत असताना, सरकार यंत्रणेचा गैरवापर करत असताना आपल्याला आपला स्वाभिमान, इतिहास हक्क अधिकार जर सुरक्षित ठेवायचे असतील तर आता वेळ आहे सर्वांना एकत्र येण्याची.

महापुरुषांच्या विचार धारेवर आधारित सर्व सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन जर आवाज उठवला तर आवाज मोठा होईल, सर्व जन एकत्र आले आणि महाराष्ट्र बंद ची हाक दिली तर जनतेतून चांगला प्रतिसाद मिळाला, ही एकता जर आपण टिकवून ठेवली तर सरकारला घाम फुटेल आणि आपली संविधानीक लढाई यशस्वी करू, आणि आपलेच असलेले परंतु त्यांच्या सोबत असलेले आमदार खासदार यांच्या वर तरी दबाव येईल. आणि आपण आपली लढाई संविधानीक मार्गाने लढून सरकार वर नियंत्रण ठेऊ शकतो. आता वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून केवळ देश देशाची जनता भारतीय संविधान आणि संविधान ज्या महापुरुषांच्या विचारवारेवर तयार झालेले आहे त्या सर्वबहूजन महापुरुषांचा मान सन्मान करण्यासाठी आपण एकत्र येणे काळाची गरज आहे. एक मनोज सरकारच्या पाया खालची जमीन सरकवू शकतो तर आमचे करोडो मनोज एकत्र आले तर यांच्या तोंडातुन चुकिचा शब्द चुकूनही निघणार नाही. चंद्रकांत पाटील यांच्या वर शाईफेक झाली आणि मनोज व त्यांच्या इतर साथीदारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल केले केले. तेही सर्व गुन्हे जवळपास हत्येसंबधीच आहेत.

आता यांना शाईची भिती वाटते. तर विचार करा आपला इतिहास कशाचा आहे. बर विषेश म्हणजे एका व्यक्तीवर शाई फेक झाली म्हणून पोलीस निलंबित, पत्रकारांवर गुन्हा दाखल, संशयतीवार गुन्हा दाखल, माझा फोटो बरोबर कसा काढला म्हणून पुर्वनियोजीत कट होता असा आरोप चंद्रकांत पाटील करतात. एक झाकन शाईने माणसाच्या जिवाला भिती आहे मान्य आहे. म्हणून तुम्ही पोलीस निलंबित करता, पत्रकारावर गुन्हा दाखल करा म्हणता मग चंद्रकांत पाटील आणि महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री यांना माझा थेट सवाल आहे. तुम्ही निरपेक्ष आहात, सत्तेचा पदाचा वापर निरपेक्ष पद्धतीने करता मग आज तुम्हाला माहिती झाले झाकणभर भाई एका माणसाच्या तोंडावर निषेध करण्यासाठी फेकली तर तो हत्येचा कटच होता याची खात्री झाली, म्हणून तुम्ही गंभीर स्वरुपाची गुन्हे दाखल करून पोलीस निलंबित केले मग भिमाकोरेगाव येथे लाखों लोकांवर दगडफेक झाली, डोकांचे डोके फोडले गेले, वाहने जाळली गेली, लहान मुले, स्त्रिया यांना अंधारामध्ये जिव मुठीत घेऊन तेथून पळावे लागले तेव्हा तुम्हाला तो प्राणघातक हल्ला दिसला नाही, तेव्हा तुम्हाला सुनियोजित कट दिसला नाही, तेव्हा तुम्हाला रक्ताभांबळ झालेले लोक दिसले नाही.

आणि भिमाकोरेगाव प्रकरणात तुम्ही काय केले आरोपी ना मोकाट सोडून निरापराध तरुणांवर खोट्या केसेस करून त्यांना तुरुंगात डांबले. अहो ते तेथे शुरविरांना नमन करायला गेलेले लोक होते दूरवरून आलेले लोक होत होते त्यांच्या वर प्राणघातक हल्ला होतो तरी तुम्ही शांततेने बघत होता, मुख्य आरोपींना आपणच निर्दोष म्हणून घोषित केले. भिडे हे मुख्य आरोपी होते पण तेव्हा गृहमंत्रीच बोलले होते ते तेथे उपस्थितीत नव्हते तर ते आरोपी कसे मग फडणवीस साहेब. मनोज हा सामाजिक संघटनेचा स्वाभिमानी कार्यकर्ता त्या जिगरबाज कार्यकर्त्यांने केवळ महापुरुषांचा अवमान झाला म्हणून निषेध व्यक्त करण्यासाठी शाई फेकली तर तेथे शरद पवार किंवा तुम्ही ज्या विरोधी पक्षाचे नाव घेतले ते होते का? सरकारचा पक्षपाती पण धुडकावून लावण्यासाठी आज आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या संघटनेने आवाज उठण्याऐवजी सर्वांनी एकत्र येऊन आवाज उठवला तर सरकार वर अंकुश ठेवता येईल.

दुसरा सर्वात महात्वाचा मुद्दा मनोज ने शाईफेक केली पोलीसांनी त्याला पकडले. पुढील चौकशी साठी पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेले. तर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीसांसमोर मनोज ला जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या लोकांवर काय कारवाई केली? चंद्रकांत पाटील यांनी शाईफेकीचा उल्लेख करताना पटोले या शब्दांचा उच्चार कसा केला सर्व महाराष्ट्राने पाहीला चंद्रकांत पाटील यांच्या असे संस्कार आणले तरी कुठून? त्यांच्या त्या वक्तव्यावर गृहखात्यांनी काही कारवाई केली का? सत्ताधारी एक आमदार बरगळला शाई फेकणाऱ्याच्या घरात घुसु अशी चिथावणीखोर वक्तव्य केल्या नंतर तुम्ही आमदारावर काय कारवाई केली तर काहीच नाही. महापुरुषांचा अवमान करणारे सत्ताधारी, चिथावणीखोर वक्तव्य करणारे सत्ताधारी, धमक्या देणारे सत्ताधारी कार्यकर्ते आणि गुन्हे दाखल महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर! काय चाललेय काय नेमके हे. नैतिकता म्हणून एवढे वाचाळविर बरगळले पक्षाने, सरकारने काय कारवाई केली तर काहीच नाही. यावरून लक्षात येते सरकार लोकांच्या विरोधात आणि महापुरुषांच्या विरोधात आहे. म्हणून समविचारी सामाजिक संघटनांनी एकत्र आले तर आपण आपला वारसा टीकवुन ठेऊ शकतो. म्हणून सध्या वेळ आहे सर्वानी एकत्र येऊन एक महापुरुषांना अभिप्रेत समाज व्यवस्था घडवण्याची.

✒️विनोद पंजाबराव सदावर्ते(रा.आरेगांव,ता.मेहकर)मो:-९१३०९७९३००