दिव्यांगदूत नागेश खांडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व रोग निदान आरोग्य तपासणी शिबीर

34

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.16डिसेंबर):-दिव्यांगदूत व माण तालुक्यातील दिव्यांग बंधू भगिनींची मनोभावे सेवा करणारे नागेश खांडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रहार दिव्यांग क्रान्ती संघटना, आरोग्य विभाग जिल्हापरिषद व जिल्हा शल्य चिकित्सक व डॉ.दोलताडे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ,म्हसवड यांचे सहकार्याने माण तालुक्यातील सर्व दिव्यांग बंधू भगिनी साठी सर्व रोग निदान आरोग्य तपासणी शिबीर व भव्य रक्तदान शिबीर डॉ.दोलताडे मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल,शिंगणापूर रोड,म्हसवड येथे सोमवार दिनांक 19 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10:00 ते दुपारी 2:00 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.

यावेळी सदर शिबिरास रामदास खोत, महासचिव तथा संपर्क प्रमुख महा.राज्य प्रहार दिव्यांग क्रान्ती संघटना,शैलेश सूर्यवंशी,उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी माण खटाव,श्रीशैल वट्टे,तहसीलदार माण,सचिन माने,मुख्याधिकारी म्हसवड नगरपालिका, सर्जेराव पाटील, गटविकास अधिकारी, पंचायत समिती माण,लक्ष्मण कोडलकर,तालुका आरोग्य अधिकारी, राजकुमार भुजबळ, सहाययक पोलीस निरीक्षक, म्हसवड पोलीस स्टेशन यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

डॉ. बाबासाहेब दोलताडे,अस्थीरोग तज्ञ,डॉ.प्रशांत घुटुकडे, जनरल फिजिशियन, डॉ.रोहन मोडसे, मेंदू व हृदय रोग तज्ञ,डॉ. अनिता घुटुकडे, जनरल फिजिशियन, डॉ.हेमा पिंजारी,नेत्र रोग तज्ञ,डॉ. दीप्ती पाटील, जनरल फिजिशियन, डॉ.भारत काकडे,वैदयकीय अधिकारी, म्हसवड प्रा.आ.केंद्र, डॉ.शुभंकर देशमुख, वैदयकीय अधिकारी, म्हसवड प्रा.आ.केंद्र या तज्ञ डॉकटर यांचेकडून मोफत तपासणी होणार आहे.

या शिबिरात माण तालुक्यातील सर्व दिव्यांग बंधू-भगिनींसाठी तज्ञ डॉक्टरांच्या कडून मोफत सर्व रोग निदान आरोग्य तपासणी शिबिर व मोफत औषधोपचार , आरोग्य सल्ला,रक्तदान शिबिर,
नवीन फक्त अस्थीव्यंग दिव्यांगांसाठी दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यासाठी कॅम्प आयोजित केला आहे.या शिबिरानिमित्त प्रहार दिव्यांग क्रान्ती संघटनेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे की मोफत शिबिराचा लाभ माण तालुक्यातील सर्व दिव्यांग बंधू भगिनींनी घ्यावा.