मतदारांच्या भेटीसाठी सरपंच-सदस्य उमेदवारांची पायी फेरी

31

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.16डिसेंबर):- तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे. तसा सर्वच पक्षांचा प्रचाराचा जोर वाढत आहे. आता प्रत्येक पक्षाचे उमेदवार पाई फेरी काढून मतदारांच्या घरी जात आहेत. तसेच दुचाकी रॅली ही काढली जात आहे. त्यामुळे प्रचाराचा जोर वाढल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसत आहे. गेवराई तालुक्यातील 75 सरपंच व 651 सदस्यांसाठी 18 डिसेंबर रोजी मतदान होत असून, थेट जनतेतून सरपंच निवड होत असल्याने गावात प्रचाराची रंगत वाढली आहे.

आरोप-प्रत्यारोप करत प्रचार सुरू असताना आता प्रचाराचे मोजकेच दिवस शिल्लक राहिले असून, प्रचाराची गती वाढली आहे. यात आता प्रत्येक पक्षाचे उमेदवार हे थेट मतदारांच्या घरापर्यंत जाऊन पायी प्रचार रॅली, मोटरसायकल रॅली काढत आहेत. यात पक्ष, चिन्हांचे झेंडे, घोषणाबाजी नेत्याच्या नावाने जयघोष केला जात आहे. आपल्या पक्षाचे उमेदवार कसे चांगले आहेत. हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील राजकारण चांगलेच ढवळून निघत आहे. आता प्रचाराचे मोजकेच दिवस शिल्लक राहिल्याने प्रचारात वेगवान आहे.