बेवारस अवस्थेत पडलेल्या वृद्धास एकनिष्ठानी दिले जिवनदान

36

✒️खामगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

खामगांव(दि.20डिसेंबर):- येथील एकनिष्ठा जनसेवा फाऊंडेशन नेहमी जनसेवेत सदैव तत्पर आहे. या गोष्टीची जाणीव ठेवत अमित खत्री यांनी एकनिष्ठा जनसेवकांना कॉल करून सांगितले की अग्रेसन चौक स्थित श्री द मंदिरा समोर एक अनोळखी आजोबा तीन दिवसा पासून बेवारस स्थितीत जमिनीवर पडलेले आहे.

असे कळताच काल दिनांक १९ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता एकनिष्ठा जनसेवा फाऊंडेशन संस्थापक सुरजभैय्या यादव यांच्यासह करण सरडे, प्रदीप शमी, सिद्धेश्र्वर निर्मळ, लखन सारसर घटनास्थळी पोहचले बेवारस वृध्दास विचारपूस केली असता त्यांनी अशी माहिती दिली मी ३ दिवसा पासून येथे पडेल आहे मला उठता येत नाही बसता येत नाही आणि माझ्या शरीरात कुठलीही हालचाल होत नसल्याने मी लोकांना विनंती केली मला सामान्य रुग्णालयात नेऊन भरती करून द्या माझ्या मागे पुढे कोणी नाही आहे.

माझे नाव तुकाराम किसन गव्हाळे वय ६० वर्ष राहणार लक्कडगंज भडभडी जीन खामगांव आहे. असे म्हणताच एकनिष्ठा फाऊंडेशनच्या जनसेवकांनी लगेच भगसिंग चौक येथील ऑटो चालक शर्मा यांना बोलावून त्यांच्या ऑटो रिक्षा मध्ये बेवारस वृद्धास टाकून सामान्य रुग्णालयात नेऊन वार्ड क्रमांक १ मध्ये भरती करून दिले सध्या वृद्धावर उपचार सुरू आहे अशी माहिती सुरजभैय्या यादव यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.