ग्रामपंचायतीच्या बारा पैकी चार जागेवर बाळासाहेबांच्या शिवसेना यांचा दावा

31

🔹या जागेवर आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केला होता दावा

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.21डिसेंबर):- तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर होताच राजकीय मंडळीची सध्या रशीखेच दिसत आहे.आपले व आपल्या पक्षाचे वर्चस्व दाखवण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरीत निवडून आलेले सरपंच आपल्याच गटाचा असल्याचा दावा प्रत्येक राजकीय मंडळी केला जात असल्याचे चित्र सध्या गंगाखेड विधानसभेमध्ये दिसत आहे. कालच ज्या जागेवर आमदार रत्नाकर गुट्टे आणि दावा केला होता.

त्याच पैकी चारही जागेवर आज बाळासाहेबांची शिवसेना यांनी दावा केला असून त्यांच्या वतीने निवडून आलेल्या नवनिर्वाचित सरपंच यांचा शासकीय विश्रामगृह याठिकाणी बाळासाहेबांची शिवसेना माजी खासदार सुरेश जाधव ,जिल्हा प्रमुख माधवराव कदम, विधानसभा प्रमुख चंद्रकांत सूर्यवंशी, पूर्ण शहर प्रमुख विशाल किरडे ,पालम तालुका प्रमुख अशोकराव पौळ, भानुदास कराळे,यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.बाळासाहेबाची शिवसेनेना गटाने दावा केला की चिलगरवाडी, डोंगरजवळा, शंकरवाडी ,भांबरवाडी या गावातील सरपंच हे बाळासाहेबांची शिवसेना गटाच्या वतीने विजय झाले असून त्याचा सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. यावेळी तालुका प्रमुख माऊली फड ,माधव शिंदे, अर्जुन पुरणाळे अमिश तडवी पठाण ,लिंबाजी वाव्हाळे, अँड. सोमनाथ फड, तालुका महिला प्रमुख जनाबाई फड नरेंद्र भालेराव व अनेक बाळासाहेबांची शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते