उमरखेड शहरात घरफोडी करणाऱ्या चोरट्यास केली अटक

45

🔺पोलीस स्टेशन उमरखेड ची कारवाई

✒️सिद्धार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी’यवतमाळ)मो:-9823995466

यवतमाळ(दि. 20 डिसेंबर):-शहरात घरफोडी करून दरोडा टाकणाऱ्या चोरट्यांना उमरखेड पोलीस स्टेशन त्यांनी चोरट्यांवर केली कारवाई.उमरखेड शहरामध्ये दिनांक 13 डिसेंबर 2022 रोजी कैलास हरिभाऊ शिंदे हे आपल्या नातेवाईकांच्या लग्न करिता माहूर येथे गेले होते.

लग्न आटपून दि. 14 डिसेंबर 2022 रोजी उमरखेड येथील हरीओम संकुल जवाहर वार्ड उमरखेड या घरी परत आले.

तेव्हा त्यांना त्यांच्या घरी ठेवून असलेले मुलीच्या लग्नाकरिता तयार केलेले सोन्याचे दागिने तसेच घरगुती सोन्याचे दागिने असे एकूण 48.50 तोळे सोने 485 ग्राम व चांदीचे दागिने 2 किलो व नगदी 1,00,000/रू. असा एकूण 9,3,200/रू. किमतीचा घरात च्या कपाटात ठेवून असलेल्या मुद्देमाल चोरीला गेला असल्याने लक्षात आल्याने त्यांनी पोलीस स्टेशन उमरखेड येथे दिलेल्या तक्रारीवरून अपराध क्रमांक 828/2022 कलम 380,454,457 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर घरपोडी ही मोठ्या स्वरूपाची असल्याने माननीय पोलीस अधीक्षक पवन बनसोड साहेब यांनी सदरचा घरपोडीचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याच्या सूचना उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड प्रदीप पाडवी साहेब व पोलीस निरीक्षक अमोल माळवे साहेब उमरखेड यांना दिल्या होत्या.

त्यावरून वरिष्ठांचे मार्गदर्शन सदर गुन्ह्याचे तपास अधिकारी सपोनी प्रशांत देशमुख यांनी गुन्ह्याचे तपासात गोपनीय बातमीदार तसेच तांत्रिक बाबींचा आधार घेऊन व घटनास्थळीचा बारकाईने अभ्यास केल्यावरून नवख्या चोरट्याने व फिर्यादीचे घर घरातील चीज वस्तू या संबंधित ज्ञान असणाऱ्या व्यक्तीने चोरी केली असल्याचे व सदरची घटना ही दिवसा दुपारी सुमारात घडली असल्याचे निष्कर्ष पर्यंत पाहून गुन्ह्यातील फिर्यादी यांचे नातेवाईक व इतर संबंधी यांच्याकडे गुन्ह्या संबंधित तपास करावयास सुरुवात केली.

आणि गुन्ह्याचे तपासा अनुषंगाने पुरावा गोळा करून नमूद फिर्यादी यांचा सख्खा भाचा आरोपी नामे अक्षय नामदेव ढोले वय 28 वर्ष राहणार सुकळी तालुका आर्णी जिल्हा यवतमाळ यास आज दि. 20 डिसेंबर 2022 रोजी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्हा संबंधित आणि कौशल्यपूर्वक तपास केला असता नमूद आरोपीने सदरची चोरी घटनेच्या दिवशी वेषांतर करून केली असल्याची कबुली दिली.

नमूद आरोपी यांचे कडून गुन्ह्यात चोरी केलेल्या मुद्देमाला पैकी 90% व नगदी 19 हजार रुपये जप्त करण्यात आले असून उर्वरित मुद्द्येमाल व रक्कम हस्तगत करण्याकरिता पुढील तपास सुरू आहे.

सदरची कार्यवाही ही पोलीस निरीक्षक यवतमाळ डॉ. पवन बनसोड साहेब अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी साहेब यांच्या मार्गदर्शनात अमोल माळवे साहेब पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन उमरखेड सपोनी प्रशांत देशमुख पोना/संदीप ठाकूर, कैलास नेवकर, पोका/नितीन खवडे,अतुल तागडे सर्व पोलीस स्टेशन उमरखेड तसेच सायबर सेल यवतमाळ येथील सपोनी मुंडे व अंमलदर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे गुन्हा उघडकीस आणणाऱ्या सर्व अधिकारी अंमलदार यांना पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी प्रोत्साहन पर बक्षीस सुद्धा जाहीर केले आहे.