येवला शहरातील गुंड दबंगांना चाप बसवा म्हणून शाळेतील विद्यार्थी कडून ग्रामीण पोलीस यांना निवेदन

32

✒️संदिप सोनवणे(विशेष प्रतिनिधी,येवला)मो:-९६०४१६२७४०

येवला(दि.22डिसेंबर):- येवला शहरात व परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात गुंड आणि दबंगगिरी करणाऱ्या लोकांनी उच्छाद मांडला आहे. मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांचे पालक प्रकाश शेजवळ राहुल गुंजाळ ऋषिकेश डोळस समाधान धीवर येवल्यातील गुंड, दबंगांना चाप बसवा अशी मागणी रिपाइं ने केली आहे. ग्रामिण भागातुन शिकण्यासाठी येणाऱ्या महाविद्यालयीन तरुणांना दादागिरी करणे, मारहाण करणे,व त्यांच्यात धाकदपटशा निर्माण करण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून काही मंडळींनी सुरू केले आहे. या मुळे विद्यार्थी वर्गाला दहशतीखाली वावरत शिक्षण घेण्याची वेळ आली आहे. याचीच दखल प्रशासनाने घ्यावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( ए) दिपक निकाळजे पक्षाच्या वतीने तहसीलदार प्रमोद हिले यांना निवेदन देण्यात आले आहे.

नाशिक जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी चार्ज घेतल्यापासून जिल्ह्यासह येवला शहरात व तालुका परिसरात अवैध धंदे व गुन्हेगारीला आळा बसत असल्याचे अश्वासक चित्र पाहायला मिळत आहे, परंतु गुंडपुंड लोकांना देखील याची झळ बसली पाहिजे व कायद्याचा धाक त्यांच्यात निर्माण करण्याची जबाबदारी प्रशासनाने पार पाडावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

निवेदनावर तालुकाध्यक्ष प्रवीन संसारे, ऋषिकेश संसारे, आकाश संसारे,करन संसारे, सचिन संसारे, दर्शन संसारे, आदित्य संसारे, आकाश साळवे, प्रशांत संसारे व येवला तालुका पत्रकार संघ सामाजिक कार्यकर्ते संतोष गायकवाड यांनी सही केली आहे.सदर वरील निवेदनाच्या प्रति जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, आमदार छगन भुजबळ साहेब, गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांना पाठवण्यात आल्या आहेत.