अनेक वर्षापासुन प्रलंबित असलेला रिंग रोडकरीता सर्वांच्या पाठिंब्याचे पत्र- पत्रकार परिषद घेऊन सामाजीक कार्यकर्त्यांनी जाहीर दिला पाठिंबा..!!

35

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)
___________________________
पुसद(दि.23डिसेंबर):-गेल्या वीस ते पंचेविस वर्षापासून प्रलंबित असलेल्या रस्ते विकास योजने अंतर्गत शहराबाहेरून जाणाऱ्या रिंग रोडची मागणी केल्या जात होती. तालुक्यातील जनतेची रिंग रोड साठीची मागणी लक्षात घेता पुसदच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला पुसद शहर विकास कृती समितीतर्फे दि.४ फेब्रुवारी २०१६ रोजी समितीच्यावतीने निवेदन दिले होते.पंरतु सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता एस.डी.धोत्रे यांना देण्यात आले होते. त्यावेळेस तत्कालीन कार्यकारी अभियंतांनी रिंग रोड मंजूर करण्याकरिता समितीच्या सदस्यांना आश्वासन दिले होते.त्यांचे सहकारी उपकार्यकारी अभियंता आर. मालवत यांच्यासह विद्यमान उपकार्यकारी अभियंता प्रकाश झळके यांनी रिंग रोड संदर्भात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी केलेल्या कामाबद्दल समितीच्यावतीने जाहीर आभार व्यक्त केल्या आहे.तशी पत्रकार परिषद येथील हॉटेल अतिथीमध्ये दि.२२ डिसेंबर २२ रोजी दुपारी १२ वाजता घेऊन सर्वांनी जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.

पुसद शहराबाहेरील रिंग रोड हा कारला रोड वसंत उद्याच्या पश्चिमेकडून वाशिम रोड वरील डेपोच्या पश्चिम बाजूने व्हावे अशी मागणीच रिंगरोड निर्माण कृती समितीचे अशोक बाबर,शरदभाऊ मैंद, उमाकांत पापीनवार, विनोद जिल्हेवार, निखिल चिददरवार, पुसद चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष सुरज डुबेवार व विश्वेश्वराय इंजिनियर्स आर्किटेक असोसिएशनचे अध्यक्ष योगेश पांडे, कार्याध्यक्ष सै.अन्वर अली तर्फे केल्या जात आहे. तसेच वालतुर,भोजला रोड ते दिग्रस,यवतमाळ रोड महादेव मंदिराजवळील अमर शक्ती ऑइल मिल जवळून जाणार रोड माहूर रोड वरून कोपरा फाटा या ठिकाणी जोडला जाणार आहे. अशी माहिती देखील पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. रिंगरोड तयार करतांना रोड खाली ज्या कास्तकारांच्या जमिनी जातील त्यांना शासन दरापेक्षा चार पटीने जास्त रक्कम देखील मिळणार आहे.त्यासोबतच ज्या कास्तकारांच्या शेतातून रिंग रोड जाईल त्या शेतीचे आजच्या बाजार भावापेक्षा तीन ते चार पट दर देखील वाढणार आहे. रिंग रोड झाल्यात भविष्यात रोडवर कास्तकारांना व्यवसाय सुद्धा चालू करता येणार असल्याचे भाकीत देखील केले आहे.

तसेच रिंग रोड झाल्यास शहरापर्यंत येणाऱ्या रोडमुळे सर्वच जमिनीच्या किमती देखील वाढणार आहेत. रिंग रोड झाल्यास सर्वांनाच याचा फायदा होणार असल्याचा दावा देखील केला आहे. रिंग रोड झाल्यास शहराच्या विकासात भर देखील पडणार असून शहरांमध्ये बाहेरून येणारी जड वाहतूक व इतर वाहने सुद्धा बाहेरून गेल्यामुळे शहरातील वारंवार निर्माण होणारी वाहतुकीची कोंडी व समस्या देखील दूर होणार आहे.त्यासोबतच अपघाताचे प्रमाण देखील कमी होणार आहे. रिंग रोडच्या सर्वेचे काम नोव्हेंबर २०१८ मध्ये पुसद येथील साकार इंजीनियरिंग फार्मचे सदस्य संजय तांबेकर, व त्यांचे सहकारी दिगंबर हरणे, सतीश भुसारे, परमेश्वर भेंडे व दिलीप काळे यांचे माध्यमातून एक महिन्याच्या कालावधीत सर्वे पूर्ण केला होता हे विशेष.

बॉक्स
आयएस अधिकाऱ्याची सकारात्मक भूमिका

पुसद येथे उपविभागीय अधिकारी पदी म्हणून रुजू झालेले सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.यांना रिंगरोड संदर्भात निवेदन देखील देण्यात आले होते. त्या रिंग रोडच्या निर्मिती बद्दल शेवटपर्यंत प्रयत्नशील राहू असे आश्वासन दिले आहे.पुसद शहराकरिता रिंग रोड होणे अत्यंत गरजेचे असल्यामुळे व वारंवार होत असलेल्या अपघाताचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने शहरातील काही संघटनांनी पुसद रिंग रोड कृती समितीला शेवटपर्यंत पाठिंबा देण्याचे पत्र पुसद चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व विश्वेश्वराय इंजिनियर्स आर्किटेक असोसिएशन यांनी दिला आहे.

रिंगरोड साठी तीनही आमदार व खासदाराकडून सकारात्मक भूमिका

संघटनेच्यावतीने ना. माणिकराव ठाकरे यांना दि.१८ डिसेंबर २०२२ रोजी निवेदन दिले असता त्यांनी तत्काळ यवतमाळचे मार्ग प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता अडचुळे यांना भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधला असता रिंग रोड साठी संरेखा तात्काळ मंजुरा देण्यात यावी असे सांगितल्याने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अधिकच उत्साहात भर पडली. त्यानंतर कार्यकारी अभियंता यांनी पुढील कारवाईची माहिती सुद्धा ना. ठाकरे यांना कळविण्यात यावे असे सांगितले आहे. त्यासोबतच यवतमाळ वाशिम मतदार संघाच्या खा. भावना गवळी यांना सन २०१६ मध्ये निवेदन दिले होते. त्यानंतर दि.१८ डिसेंबर २०२२ रोजी पर्यंत निवेदन देण्यात आली आहेत. रिंग रोड बद्दल यापुढे पुर्णतः सहकार्य करण्याची भूमिका देखील खा. गवळी यांनी दर्शविली आहे. पुसद विधानसभा मतदारसंघाचे आमदार इंद्रनील नाईक,ॲड.निलय नाईक व डॉ. वजाहत मिर्झा यांनी सुद्धा यापुढे रिंग रोडच्या निर्मितीसाठी लक्ष देण्याचे आश्वासन दिले आहे.